Goa Fishing Season: दहा दिवसांपूर्वीच बोटी धक्क्यावर! यंदा मासळी कमीच, हंगामाची आज सांगता; मजूरही परतले गावाला

Goa fishing season ends May 31: मासेमारी हंगाम रविवारी (ता. ३१) संपत असून यंदा बहुतांश बोटमालकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
Goa Fishing Season
Goa Fishing SeasonDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मासेमारी हंगाम रविवारी (ता. ३१) संपत असून यंदा बहुतांश बोटमालकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे ९५ टक्के बोटी दहा दिवसांपूर्वीच धक्क्यावर परत आणण्यात आल्या असून अनेक मजूर गावी परतले आहेत. अपेक्षित प्रमाणात मासळी मिळाली नसल्याने बोटमालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याचे कुटबण बोटमालक संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी सांगितले.

इतर राज्यांतील बोटी गोव्याच्या समुद्रात येत असल्याने स्थानिकांना नुकसान होत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यात मच्छीमार खात्याला अपयश येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. समुद्रकिनाऱ्यावरील वाळू पट्टा व संरक्षक भिंतीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

Goa Fishing Season
Goa Job Scam: सरकारी नोकरीचा लोभ; गमावले 10 लाख रुपये, फोंडा पोलिसांत तक्रार दाखल

कुटबण जेटीवरील शौचालये, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा अपुऱ्या असल्यानेही बोटमालकांमध्ये असंतोष आहे. खात्यातील गैरव्यवहारांबाबत चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com