गुगल मॅपनं विश्वासघात केला, यायचं होतं गोव्यात पोहोचले कर्नाटकात; घनदाट जंगलात रात्रभर अडकून पडली बिहारची फॅमिली

Bihar Goa Tragic Journey With Google Map: एका कार्यक्रमाच्या निमित्ताने फॅमिली गोव्यात येत होते. दरम्यान, यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली आणि फसगत झाली.
गुगल मॅपनं विश्वासघात केला, यायचं होतं गोव्यात पोहोचले कर्नाटकात; घनदाट जंगलात रात्रभर अडकून पडली बिहारची फॅमिली
Bihar Goa Tragic Journey With Google MapDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव: अनेकवेळा नव्या ठिकाणी प्रवास करताना गुगल मॅपची मदत घेतली जाते. अनकवेळा मॅप योग्य ठिकाणी घेऊन देखील जातो पण, बऱ्याचवेळी फसगही होते. अशीच एक धक्कादायक घटना बिहारच्या फॅमिलीसोबत घडली आहे. बिहारमधून गोव्यात येणारी एक फॅमिली कर्नाटकच्या जंगलात रात्रभर अडकून पडली. विशेष बाब म्हणजे धोकादायक असलेल्या जंगलातून त्यांना सुखरुप वाचविण्यात पोलिसांना यश आले.

राजदास रणजीतदास हे कुटुंबीय बिहारमधून कारने गोव्याला यायला निघाले. गोव्याला येण्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. मॅपच्या मदतीने ते कर्नाटकातील खानापूर तालुक्यात आले. दरम्यान, येथेच त्यांची फसगत झाली आणि त्यांनी मॅपने दाखवलेला शिरोदगा आणि हेमादगा गावातून जाणारा रस्ता फॉलो केला. पुढे कारने त्यांनी सात किलोमीटर आत असलेल्या भीमगड वन्यजीव अभयारण्यात प्रवेश केला.

गुगल मॅपनं विश्वासघात केला, यायचं होतं गोव्यात पोहोचले कर्नाटकात; घनदाट जंगलात रात्रभर अडकून पडली बिहारची फॅमिली
Goa Murder Mystery: हळदोणा भावंडांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; बहिणीचा खून करुन भावाने संपवले स्वतःचे आयुष्य

भीमगड वन्यजीव अभयारण्याचा परिसर घनदाट जंगलाचा असून, या परिसरात हिंस्र प्राण्यांचा संचार पाहायला मिळतो. यापूर्वी येथे जंगली अस्वलाच्या हल्यात एका शेतकऱ्यांने पाय गमाल्याची घटना उघडकीस आलीय. शिवाय या भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने कोणालाही संपर्क साधता येत नाही. अशा ठिकाणी कुटुंब अडकून पडल्याने त्यांची गोची झाली. अखेर रात्रभर त्यांना कारमध्येच थांबावे लागले. अखेर तिथून तीन किलोमीटर बाहेर आल्यानंतर त्यांच्या मोबाईलला नेटवर्क मिळाले.

नेटवर्क मिळताच त्यांनी तात्काळ त्यांनी बेळगाव पोलिसांना संपर्क साधला. बेळगाव पोलिसांनी घटनेची माहिती खानापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी गुगल मॅपचे लोकेशन आणि जीपीएस कॉर्डिनेट्स आणि गावकऱ्यांच्या मदतीने जंगलात अडकून पडलेल्या बिहारच्या कुटुंबीयांना सुखरप बाहेर काढले. दरम्यान, जंगलाचा हा परिसर धोकादायक मानला जातो. दैव बल्वत्तर म्हणून त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडला नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

गुगल मॅपनं विश्वासघात केला, यायचं होतं गोव्यात पोहोचले कर्नाटकात; घनदाट जंगलात रात्रभर अडकून पडली बिहारची फॅमिली
Sancoale Panch Arrest: ‘सांकवाळ पंच अटकेसंदर्भात डायरी न्‍यायालयात हजर करा’, वास्‍को न्‍यायालयाचा पोलिसांना आदेश

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या जंगलात अडकून पडलेले हे कुटुंबीय मूळचे उज्जैन येथील रहिवासी आहेत. गोव्यात ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत होते. दरम्यान, यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली आणि फसगत झाली.

दरम्यान, यापूर्वी देखील अशी एक घटना गोव्यात उघडकीस आली होती. पुण्यातील फॅमिली कळंगुट येथे जात असताना त्यांची कार समुद्रकिनाऱ्यावर अडकून पडली होती. कळंगुटला पोहोचण्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली होती. पोलिसांनी तात्काळ मदत घेतल्याने त्यांना बाहेर मुख्य रस्त्याला माघारी आणले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com