Goa Murder Mystery: हळदोणा भावंडांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; बहिणीचा खून करुन भावाने संपवले स्वतःचे आयुष्य

Quitla Aldona Murder Suicide News: किटला-हळदोणा येथे सख्ख्या भाऊ-बहिणीचे मृतदेह संशयास्पदरित्या गुरुवारी आढळले होते. भाऊ सेबॅस्टिनने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविण्यापूर्वी आधी बहीण अवलिनाचा गळा दाबून ठार मारले, असे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
Goa Latest Crime News
Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Aldona Siblings Murder Suicide Case

म्हापसा: किटला-हळदोणा येथे सख्ख्या भाऊ-बहिणीचे मृतदेह संशयास्पदरित्या गुरुवारी आढळले होते. भाऊ सेबॅस्टिनने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविण्यापूर्वी आधी बहीण अवलिनाचा गळा दाबून ठार मारले, असे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण आता खून म्हणून नोंदविले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत सेबॅस्टिन कार्दोझ याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ नुसार गुन्हा नोंद केला.

सेबॅस्टिनने आधी अवलीनाचा गळा दाबून तिला ठार मारले. नंतर स्वतः दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी सेबॅस्टिन कार्दोझ (वय ६८ वर्षे) आणि अवलीना कार्दोझ (वय ७२ वर्षे) यांचे मृतदेह किटला येथील घरात आढळले होते. सेबॅस्टिन याचा मृतदेह खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत, तर अवलीनाचा मृतदेह हॉलमध्ये पलंगावर आढळला होता.

Goa Latest Crime News
Sunburn Festival: 'विरोध‌‌ करणारे नंतर वेगवेगळ्या मागण्या करतात'; सनबर्नच्या संस्थापकांनी केले खळबळजनक आरोप

लिहिली होती नोट

ही नोट पोलिसांच्या तपासानुसार, सॅबेस्टिननेच लिहिली होती. ज्यात सॅबेस्टिनने इंग्रजीमध्ये मजकूर लिहिला होता की, ‘आमची काळजी घेण्यास कुणीही नाही. त्यामुळे माझ्यासोबत हिला देखील मी नेतोय.’ सॅबेस्टिन हा गोव्यातील एका इंग्रजी वर्तमानपत्रातून उपसंपादक म्हणून निवृत्त झाला होता. तो उसकई येथे आपल्या बायको-मुलांसोबत वास्तव्याला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com