मध्‍यरात्री रस्ता समजून कार नेली नदीत! पाठलाग चुकवताना गुगल मॅपमुळे घडली दुर्घटना; कारमधील तरुण अजूनही बेपत्ता

St Estevam Accident: सांतइस्तेव्ह फेरीधक्‍क्‍यावरील घटना, युवती वाचली युवक मात्र बेपत्ता; रात्री उशिरापर्यंत थांगपत्ता नाही
St Estevam Accident: सांतइस्तेव्ह फेरीधक्‍क्‍यावरील घटना, युवती वाचली युवक मात्र बेपत्ता; रात्री उशिरापर्यंत थांगपत्ता नाही
Car Plunges into River at St EstevamDainik Gomantak
Published on
Updated on

St Estevam Incident

तिसवाडी: मध्‍यरात्रीच्‍या सुमारास कारचा सुरू असलेला पाठलाग चुकविण्‍यासाठी गुगल मॅपचा वापर करण्‍याचा चालकाचा प्रयत्‍न पूर्णत: फसला आणि कार थेट नदीत घुसली. या अपघातात कारमधील युवतीने कसाबसा किनारा गाठून आपला जीव वाचवला तर युवक बेपत्ता आहे. आज रविवारी संध्‍याकाळी उशिरापर्यंत त्‍याचा थांगपत्ता लागू शकला नाही. ही घटना टोलटो-सांतइस्तेव्ह फेरीधक्‍क्‍यावर घडली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, बेपत्ता युवकाचे नाव बशुदेव भंडारी (भरुच-गुजरात) असे असून युवतीही मूळ गुजरातचीच आहे. ती दोघेही साखळी येथील गोवा मॅनेजमेंट इन्‍स्‍टिट्यूटमध्‍ये (जीआयएम) शिकत असल्‍याचे समजते. कार थेट कुंभारजुवा नदीत घुसल्‍यावर युवतीने दरवाजा उघडून कसाबसा किनारा गाठला. तिच्‍या मागून बशुदेवसुद्धा पोहत येत होता. पण नंतर तो पाण्‍यात दिसेनासा झाला, असे त्‍या युवतीने पोलिसांना चौकशीवेळी सांगितले आहे. आज दुपारी नदीतून कार बाहेर काढण्यात आली. त्‍यात चप्पल, लॅपटॉप, बॅग असे साहित्य सापडले.

जुने गोवा पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बशुदेव आणि युवती भाडेपट्टीवर घेतलेल्या कारमधून (जीए ०३ डब्‍ल्‍यू ८४२१) पणजीच्या दिशेने जात असताना माशेल येथे एका कारला त्‍यांची धडक बसली. मात्र त्‍यांनी तेथून पळ काढला. त्‍यानंतर दुसऱ्या एका कारने त्यांचा पाठलाग केला.

पाठलाग करणाऱ्या कारपासून आपली सुटका करून घेण्‍यासाठी बशुदेवने गुगल मॅपचा वापर केला. कार वेगाने टाेळटो-सांतइस्तेव्ह येथे पोहोचल्यानंतर शॉर्टकट रस्ता असल्याचे

समजून त्‍याने कार थेट कुंभारजुवा नदीत घुसवली. त्‍यानंतर दोघांनी दार उघडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. युवती किनाऱ्यावर पोहोचली, परंतु युवक बेपत्ता झाला.

घटनेची माहिती मिळताच जुने गोवे पोलिस, अग्निशमन दल व नौदलाने घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळपासून त्‍यांनी शोधकार्य सुरू केले. परंतु नदीला भरती असल्याने त्यात अडथळे आले. अखेर दुपारी कार बाहेर काढण्यात यश आले.

युवती पोहत किनाऱ्यावर

अपघातानंतर फेरीधक्क्याजवळ असलेल्या मिनेझिस यांच्या घरी युवती गेली आणि तिने मदतीसाठी विनवणी केली. एक कार आमचा पाठलाग करत होती म्हणून आम्ही चुकून येथे पोहोचलो आणि कार पाण्यात गेली. हे पाहून पाठलाग करत असलेल्या कारने तेथून पळ काढला. आपण कशीबशी पोहून किनाऱ्यावर पोहोचली, पण माझा मित्र माझ्या मागे होता, तो दिसला नाही, असा घटनाक्रम तिने सांगितला. त्यानंतर सूचित केल्यानंतर तीनच्‍या सुमारास पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले व ते मुलीला घेऊन गेले, असे मिनेझिस यांनी सांगितले.

१) हा अपघात पाठलाग करणाऱ्या वाहनामुळे झाला का, या दिशेने तपास सुरू आहे. साखळी येथे ‘जीआयएम’मध्ये शिकत असलेल्या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गुजरातस्थित बशुदेव भंडारी हा चार दिवसांपूर्वी गोव्‍यात आला होता. डिचोली व कळंगुट येथे राहिल्यानंतर काल दिवसभर ते कारमधून फिरत होते. आज सकाळी तो गुजरातला परतणार होता, असे जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी सांगितले.

२) बशुदेव मैत्रिणीसोबत काल रात्री कारने जात असता माशेल येथे एका वाहनाला धडक बसली. तो न थांबताच पुढे गेल्याने धडक बसलेल्या वाहनाने पाठलाग केला. त्यामुळे भेदरलेल्या अवस्थेतील बशुदेव याने रस्ता दिसेल तेथे वाहन भरधाव वेगाने हाकले. सांतइस्तेव येथे पोचले असता फेरीधक्क्याचा अंदाज आला नाही व कार थेट पाण्यात गेली, असे पडवळकर यांनी सांगितले.

नदीत आहे मगरींचा संचार

टोळटो-धावजी फेरीमार्ग लहान असला तरी तेथे बार्ज वाहतूक होते. कुंभारजुवा कालवा सुमारे २० फूट खोल आहे. त्यामुळे वरवर सहज दिसणारा हा टप्पा बऱ्यापैकी खोल आहे. तसेच कालव्यात मोठ्या प्रमाणात मगरी असल्याने ते देखील धोकादायक आहे.

St Estevam Accident: सांतइस्तेव्ह फेरीधक्‍क्‍यावरील घटना, युवती वाचली युवक मात्र बेपत्ता; रात्री उशिरापर्यंत थांगपत्ता नाही
Student Drowned at St Estevam: सांतइस्तेव येथे नदीत बुडून कारसह विद्यार्थ्याला जलसमाधी

किरकोळ अपघात बेतला जीवावर

गुगल मॅपच्‍या साहाय्‍याने ‘शॉर्टकट’

युवक-युवती दोघेही मूळ गुजराथी

साखळीतील ‘जीआयएम’चे विद्यार्थी

कारमध्‍ये सापडली बॅग, लॅपटॉप, चप्पल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com