2017 मध्ये गोव्यात काँग्रेसने 17 जागी मारली बाजी पण, भाजपने अस केल सरकार स्थापन

गोवा निवडणूक 2017 मधील समीकरणे काय होती? जाणून घ्या काय होती परिस्थिती..
Goa Assembly
Goa Assembly Dainik Gomantak

भारतीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 3.30 वाजता गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. गोव्यातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 4 फेब्रुवारी 2022 रोजी संपत आहे. गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. गोवा विधानसभेत बहुमताचा आकडा 21 आहे. गोव्यात 2017 मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. गोवा विधानसभा निवडणूक-2017 मध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु भारतीय जनता पक्षाने गोव्यात सरकार स्थापन केले. गेल्या निवडणुकीत गोव्यात मतदानाची टक्केवारी 83 टक्के होती.

Goa Assembly
'आगामी गोवा विधानसभा निवडणुका पार पाडण्याचे आयोगासमोर आव्हान'

गोवा निवडणूक 2017 मधील समीकरणे काय होती?

गोवा विधानसभा निवडणूक (Assembly elections) - 2017 मध्ये काँग्रेसने (Congress) 36 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 17 जागा काँग्रेसने जिंकल्या. जे बहुमताच्या आकड्यापेक्षा 4 कमी होते. -भारतीय जनता पक्ष (भाजप) ने गोवा (goa) विधानसभा निवडणूक-2017 मध्ये 36 जागा लढवल्या होत्या. भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या. गोवा फॉरवर्ड पार्टीने (GFP) 4 जागा लढवून 3 जागा जिंकल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (एमजीपी) 34 जागा लढवून 3 जागा जिंकल्या. अपक्षांनाही 3 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 18 जागा लढवल्या, मात्र त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली. आम आदमी पार्टी 40 जागांवर लढली पण एकही जागा जिंकू शकली नाही.

भाजपने 2017 मध्ये MGP, GFP च्या मदतीने गोव्यात सरकार स्थापन केले, सगळ्यांनाच अपेक्षा होती की काँग्रेस, जो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तो तेथे गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पार्टी आणि इतर लहान पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू शकेल. 3 जागा जिंकल्या. पण काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांच्यात निवडणुकीपूर्वी किंवा नंतर कोणतीही औपचारिक युती झाली नाही. नाट्यमय गोंधळानंतर, भाजपने (BJP) MGP, GFP आणि दोन अपक्ष आमदारांच्या मदतीने 21 चे बहुमत मिळवले आणि गोव्यात सरकार स्थापन केले. गोव्यात पुन्हा एकदा भाजपला मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी मिळाले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. त्यानंतर भाजपने डॉ. प्रमोद सावंत यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री (CM) केले.

Goa Assembly
Goa Assembly 2022: धसका युतीचा; खरी कुजबूज!

गोव्यात 2017 च्या निवडणुकीत प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. गोव्यातील शेवटची विधानसभा निवडणूक 4 फेब्रुवारी 2017 रोजी 40 जागांसाठी झाली होती. गोव्यातील 40 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक (Election) झाली. पूर्वीच्या विधानसभेचा कार्यकाळ 18 मार्च 2017 पर्यंत होता. 11 मार्च 2017 रोजी गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. 2017 गोवा विधानसभा निवडणुकीत प्रथमच VVPAT-सक्षम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे राज्यभरात वापरली गेली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com