पणजी: कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका पार पाडण्याचे आव्हान आयोगासमोर आहे. आयोगाने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून खबरदाचे उपायही घेण्यात येणार आहेत. त्यामुळेच गोव्यात प्रत्येक मतदान केंद्रावर एक हजार मतदारांची मर्यादा ठेवलेली आहे. (Latest News On Goa Assembly Election 2022)
त्यामुळे आता राज्यात 2017 च्या तुलनेत अधिक मतदान केंद्र असतील. त्यात यावेळी 80 केंद्रांची भर पडलेली आहे. मतदान केंद्रावरील गर्दी कमी करण्याचा हा उद्देश असून त्याद्वारे नागरिकांना मतदान करणे सोपे जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सांगितले. ‘गोमन्तक’ शी त्यांनी खास संवाद साधला तो असा...
प्रश्न: तुम्ही गेली सहा वर्षे गोव्यात आहात. झालेल्या आणि आगामी निवडणुकीत कोणता फरक जाणवतो?
गोव्यातील निवडणुका (Goa Election) नेहमीच उत्सवी मात्र शांततेत होतात. लोकांमध्ये उत्साही वातावरण आहे. 2017 च्या तुलनेत यावेळी सोशल मीडियाचा वापर जास्त दिसून येतो. या निवडणुकांमध्ये मतदारांशी संवाद साधण्याचे हे एक मुख्य माध्यम बनले आहे.
प्रश्न: कोरोनामुळे (Coronavirus) निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी चर्चा आहे. याबाबत खरे काय?
निवडणुका कधी घ्याव्यात किंवा घेऊ नयेत याबाबतचे सर्व निर्णय भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अखत्यारित आहेत. त्यावर भाष्य करू शकत नाही.
प्रश्न: पक्षांच्या मोठ्या सभा, रॅलीवर प्रतिबंध आहे का?
गोवा आपातकाल निबंधन केंद्र व निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे राजकीय पक्षांना आपापला प्रचार विशिष्ट मर्यादेतच करावा लागणार आहे. कोरोना पसरू शकतो अशा काही संभाव्य कार्यक्रमावर आम्ही आपले लक्ष ठेवून आहोत.
प्रश्न: सोशल मीडियावर नियंत्रण कसे ठेवणार?
आम्ही यावर दुहेरी उपाय सुचवलेले आहेत. आम्ही फेक न्युज विषयी मोठ्या प्रमाणात जागृती घडवली. स्थानिक सेलिब्रिटींच्या सहकार्याने एक मोहीम राबवली. लोकांनी खोट्या बातम्या व खऱ्या बातम्या यातील फरक जाणून घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमच्या निदर्शनास आलेल्या प्रत्यक्ष बाबींवर आम्ही कारवाई करणार आहोत.
प्रश्न: यंदाच्या निवडणुकीसाठी कोणकोणत्या प्रतिबंधक उपाययोजना आखल्या आहेत?
गोव्यात मतदानाचे प्रमाण इतरत्र पेक्षा जास्त आहे. इथे ते 80 टक्क्यांच्या वर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजलेले आहेत. राजकीय पक्षांनाही आम्ही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. जी जी मार्गदर्शक तत्वे निवडणूक आयोगातर्फे मांडली जातील त्यांचे पालन करावेच लागेल. सध्याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे आम्ही पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. गोव्यातला कानाकोपऱ्यावर लक्ष आहे. पैसे, दारू किंवा ड्रग्सचा वापर आढळल्यास कठोर कारवाई करू. प्रत्येक मतदारसंघात (Constituency) दोन वेगवेगळे फ्लाईंग स्कॉडस नजर ठेवतील. निवडणूका मोकळ्या वातावरणात आणि कोणत्याही दबावाविना व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. निवडणुकीच्या काळात धोकादायक असू शकणाऱ्या व्यक्तींची आम्ही यादी बनवलेली आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी इतर सरकारी विभागाबरोबर संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे व संभाव्य धोकादायक करू शकणाऱ्या व्यक्तींवर कोणती कारवाई करावी याविषयीही निर्णय घेतलेला आहे. मी बनवलेली यादी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर केली जाणार आहे व त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.