Goa Assembly 2022: धसका युतीचा; खरी कुजबूज!

वास्तविक भाजपने या हालचालींचा धसका घ्यायला हवा. परंतु तृणमूलच्याच उमेदवारांनी याचा खरा धसका घेतला आहे.
Goa Assembly 2022
Goa Assembly 2022 Dainik Gomantak

मयेतील पोलखोल

मये मतदारसंघात अनंत शेट हे आमदार असताना त्यांच्याच एका नातेवाईकाने सरकारी नोकऱ्यांचा घोळ केल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे शेट यांच्या उमेदवारीवर गंडांतर आले आणि प्रवीण झांट्ये यांना उमेदवारी प्राप्त होऊन ते आमदारही झाले. परंतु आता पुन्हा प्रवीण झांट्ये यांची उमेदवारी संकटात आली आहे. याचे कारणही पूर्वी झालेला नोकऱ्यांचा गफला असल्याची चर्चा मये मतदारसंघात सुरू आहे. ज्याच्यावर आरोप झाले आणि ज्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी नाकारली, तोच आता तिकीट मिळवतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. झांट्ये आपल्या प्रचार सभांमध्ये तोच मुद्दा उपस्थित करणार आहेत. मला का बरे उमेदवारी देण्यात आली होती, असा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत. त्यामुळे भल्या-भल्यांची पोलखोल होईल, अशी अपेक्षा या मतदारसंघातील चाणाक्ष निरीक्षक बाळगून आहेत. ∙∙∙

धसका युतीचा

विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची हाक दिल्लीहून आता अधिक जोरकसपणे पुढे येऊ लागल्याने गोव्यातही (Goa) काही नेत्यांना चेतावनी मिळाली आहे. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी त्याबाबत सूतोवाच करताच त्यांना तृणमूलच्या महुआ मोईत्रा यांनी प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे, तर दिगंबर कामत हेसुद्धा त्या प्रस्तावाला राजी झाले आहेत. वास्तविक भाजपने या हालचालींचा धसका घ्यायला हवा. परंतु तृणमूलच्याच उमेदवारांनी याचा खरा धसका घेतला आहे. विशेषतः फातोर्डा मतदारसंघात तृणमूलच्या उमेदवार गणल्या गेलेल्या ॲथेल लोबो आणि फियोला वाझ यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता नव्या कुठल्या पक्षात जाणार, हा त्यांच्यापुढील प्रश्न आहे. ∙∙∙

बुक्क्यांचा मार!

फातोर्डातील 22 कोटींची विकासकामे बंद करण्यात आल्याचा निषेध म्हणून रस्ता रोको करण्यात आला. त्याची तक्रार नोंदवून 41 व्या कलमाखाली फातोर्डा पोलिसांनी राजकीय कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचा छळ चालवला आहे. वास्तविक भाजपचे डबल इंजिन फातोर्ड्यातील विकासकामांना अडथळे आणते, असा आरोप त्यातून पुढे आला. त्यानंतर सरकारचेच मंत्री मायकल लोबो यांनी सोनसोडो प्रकल्प बंद पाडण्यात भाजप सरकारचेच कारस्थान असल्याचा आरोप केल्यानंतर फातोर्ड्यातील डबल इंजिनचा वारा गेला आहे. वास्तविक भाजपच्या फातोर्ड्यातील कार्यकर्त्यांना विकास हवा आहे. त्यांना विस्तीर्ण रस्ते हवेत. तसेच सोनसडोची दुर्गंधी नको झाली आहे. परंतु ‘सबका साथ सबका विकास’ म्हणवणाऱ्यांनी त्यांचीच गोची केल्याने या मतदारसंघात तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी त्यांची अवस्था झाली तर नवल ते काय? ∙∙∙

आयत्या इश्यूवर बाबू

‘आयत्या बिळावर नागोबा’ ही म्हण प्रत्येकाने ऐकली असेल. मडगावात आता ती थोडीशी बदलून ‘आयत्या इश्यूवर बाबू’ असे लोक म्हणू लागले तर नवल नाही. हे बाबू म्हणजे आमचे बाबू आजगावकर बरे का! मडगावात मुस्लिमांच्या कब्रस्तानचा प्रश्न धसास लावण्यासाठी नगरसेवक महेश आमोणकर यांनी उपोषण केले. तिसऱ्या दिवशी त्यांची समजूत काढण्यासाठी बाबू येतील, असे त्यांना सांगण्यात आले. महेशला बाबू म्हणजे नगरनियोजन मंत्री बाबू कवळेकर असतील. पण आले ते पर्यटनमंत्री. आल्या आल्या त्यांनी आपणच कब्रस्तानचा प्रश्न सोडवणार, असे सांगून मुस्लिमांना खूष करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्याबरोबर बैठक संपल्यावर या प्रश्नावर जणू आपणच तोडगा काढल्यासारखे त्यांनी भाषण ठोकले. वास्तविक या प्रश्नाकडे उपोषण करून लक्ष वेधले महेशने; पण शेवटी क्रेडिट घेतली बाबूंनी. ‘मेहनत करे मुर्गा और अंडे खाये फकीर’ अशातली ही गत झाली म्हणायची. ∙∙∙

Goa Assembly Election 2022 Latest Update

Goa Assembly 2022
कुरघोडी करून ध्येय साध्य करणे कितपत योग्य?

भाडोत्री पत्रकार

निवडणूक जवळ येताच राजकारणी लोक आपल्याला हव्या तशा बातम्या करण्यासाठी जवळचे नसल्यास बाहेरचे भाडोत्री पत्रकार सोबत घेऊन हवा निर्माण करतात. मात्र, निवडणूक जवळ आल्यानंतर ज्यांना भाडोत्री पत्रकार म्हणून बोलाविले जाते, त्यांच्याकडून कोणती पत्रकारिता केली जाणार? ते तर भाडोत्री. त्यांच्या लिखाणाने थोडाच बदल होणार आहे? मतदार तर खूपच हुशार. ते भाडोत्री पत्रकारांना आणि त्यांच्या ‘बोलवित्या धन्यांना’ पुरेपूर ओळखतात. ∙∙∙

आरोपपत्रांनी काय होणार?

निवडणूक (Goa Election) दारात येऊन ठेपल्यामुळे असेल वा एक सोपस्कार म्हणून असेल, सध्या भाजप सरकारविरोधात राज्यपालांकडे निवेदन वा आरोपपत्र सादर करण्याची टूमच निघालेली आहे. सत्ताधाऱ्यांनीही त्यात हात धुऊन घेतले व पंजाबातील काँग्रेस सरकारविरोधात निवेदन दिले. मात्र, ते गोवा राज्यपालांकडे का? हा प्रश्न अनुत्तरितच राहातो. तसे सत्तरच्या दशकात मगो व नंतर काँग्रेसविरुध्दही निवेदने दिली गेली; पण त्यांना राज्यपालांनी नव्हे तर मतदारांनी खाली खेचले, ही वस्तुस्थिती आहे. सध्याचे सरकार खाली खेचण्यासाठी मतदारांची जी मन:स्थिती तयार करण्याची गरज आहे, ती मन:स्थिती हे पक्ष तयार करू शकतील का? ∙∙∙

ही तर पालकांची पुण्याई!

‘नशीबच फुटके, त्याला कोण काय करणार?’ असे म्हणतात. खरे तर काही लोकांचे नशीब बलवान असल्यामुळे व जन्मताच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जगात प्रवेश केलेल्या या महाभागांना सर्व काही मिळते. डॅडी बाबूशच्या पुण्याईवर रोहित मेयर बनले. पती प्रेमामुळे जेनिफर मंत्री बनल्या. पतीच्या पुण्याईवर एलिना आमदार बनल्या. पापा चर्चिलच्या प्रेमाने उद्या वालंका कदाचित आमदार बनेल. पापा ज्योकिमच्या पुण्याईच्या बळावर कदाचित युरी आमदार होईल. पतीच्या कर्तृत्वाने कदाचित दिलायला, दिव्या, सावित्री आमदार बनतील. झेंडे नाचविणारे व पक्षासाठी सर्वस्व पणाला लावणारे कार्यकर्ते मात्र पालकांची पुण्याई नसल्यामुळे पालखीचे भोईच होऊन राहतील. ‘दाने दाने पर लिखा है, खानेवाले का नाम’ म्हणतात ते खरेच. ∙∙∙

हे पाप कुठे फेडणार?

ज्यांनी पोलिस शिपाई म्हणून लेखी परीक्षा दिली, त्यांना २७,२८ गुण मिळाले, तर त्यांनीच पोलिस उपनिरीक्षक म्हणून लेखी परीक्षा दिली तर त्यांना ९८,९९ असे गुण मिळाले. याचा अर्थ हा बदल फक्त ‘देवाण-घेवाणी’तून झाला आहे. भरतीमध्ये पैसे घेऊन अनेक हुशार आणि गरिबांवर अन्याय केल्याची भावना वाढीस लागली असून ज्यांची कामे झाली ते तुम्हाला मोठी रक्कम आणि दुवा देतील; पण ज्यांची कामे झाली नाहीत त्यांच्या शिव्या-शाप सहन करावे लागत आहेत. ज्यांनी ही चाल खेळली, त्यांच्याविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून अशा विस्वासघातकी लोकांना घरी पाठविण्याची भाषा उघडपणे बोलली जात आहे. पक्षासाठी काम करणाऱ्यांकडून पैसे घेऊन कामे केली जात आहेत. मग ‘पार्टी विथ डिफरंट’ कशाला म्हणता? हे तर एकाच माळेचे मणी, असे लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙

त्रिकुटावर आळ

सांगेच्या राजकारणात एका त्रिकुटाला ब्रह्मा, विष्णू महेश, किंवा त्रिदेव अशी नावे कार्यकर्त्यांनी ठेवली होती. एक मात्र खरे, त्यांच्याकडून पक्षासाठी जीवतोड धडपड केली जात होती. संपूर्ण सांगे मतदारसंघात त्यांचा परिचय आहे. कधी पक्षाची प्रतारणा केली नाही. मात्र, जेव्हा पक्षाने अन्याय केला त्याच वेळी त्यांनी आपला राग व्यक्त केला. ज्यांना विरोध करून नवख्या व्यक्तीला निवडून आणताना अनेकांकडून वाईट अनुभव घेतले. पण सतत चार निवडणुकीत विजय प्राप्त केला. असे असताना काही अपयशी माणसे आता त्यांना ‘अपशकुनी त्रिकुट’ म्हणून हिणवत आहेत. ही टीका करताना जो गोतावळा घेऊन फिरतो, त्या गोतावळ्यातील मोठे पदाधिकारीच अपशकुनी आहे. त्यांनी विजय कधीच पाहिलेला नाही. असे असताना काही लोकांना हाताशी धरून या त्रिकुटाला नावे ठेवणाऱ्यांनी स्वतःच्या अवती भोवती किती अपशकुनी लोक फिरतात ते पाहावे. ∙∙∙

फिलू तृणमूलच्या वाटेवर (Goa TMC)

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे खंदे समर्थक असलेले केपेचे माजी नगराध्यक्ष फिलू डिकॉस्ता यांनी ग्रेटर पणजी पीडीएच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तसे बाबू भाजपमध्ये गेल्यानंतर एकेकाळी त्यांचे खंदे समर्थक म्हणून सर्वांना परिचित असलेले फिलू केवळ तोंड दाखवण्यापुरतेच कवळेकर यांच्या बरोबर दिसायचे. मागच्या सहा महिन्यांत त्यांनी स्वतःला बाबूंपासून पूर्णतः दूर ठेवले होते. मात्र, आता असे ऐकू येते की, फिलू यांना तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे त्यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणासाठी देत असल्याचे जरी म्हटले असले, तरी त्यामागे राजकारण आहेच. ∙∙∙

Goa Assembly 2022
'आगामी गोवा विधानसभा निवडणुका पार पाडण्याचे आयोगासमोर आव्हान'

भाडोत्री पत्रकार

निवडणूक जवळ येताच राजकारणी लोक आपल्याला हव्या तशा बातम्या करण्यासाठी जवळचे नसल्यास बाहेरचे भाडोत्री पत्रकार सोबत घेऊन हवा निर्माण करतात. मात्र, निवडणूक जवळ आल्यानंतर ज्यांना भाडोत्री पत्रकार म्हणून बोलाविले जाते, त्यांच्याकडून कोणती पत्रकारिता केली जाणार? ते तर भाडोत्री. त्यांच्या लिखाणाने थोडाच बदल होणार आहे? मतदार तर खूपच हुशार. ते भाडोत्री पत्रकारांना आणि त्यांच्या ‘बोलवित्या धन्यांना’ पुरेपूर ओळखतात. ∙∙∙

आरोपपत्रांनी काय होणार?

निवडणूक दारात येऊन ठेपल्यामुळे असेल वा एक सोपस्कार म्हणून असेल, सध्या भाजप सरकारविरोधात राज्यपालांकडे निवेदन वा आरोपपत्र सादर करण्याची टूमच निघालेली आहे. सत्ताधाऱ्यांनीही त्यात हात धुऊन घेतले व पंजाबातील काँग्रेस सरकारविरोधात निवेदन दिले. मात्र, ते गोवा राज्यपालांकडे का? हा प्रश्न अनुत्तरितच राहातो. तसे सत्तरच्या दशकात मगो व नंतर काँग्रेसविरुध्दही निवेदने दिली गेली; पण त्यांना राज्यपालांनी नव्हे तर मतदारांनी खाली खेचले, ही वस्तुस्थिती आहे. सध्याचे सरकार खाली खेचण्यासाठी मतदारांची जी मन:स्थिती तयार करण्याची गरज आहे, ती मन:स्थिती हे पक्ष तयार करू शकतील का? ∙∙∙

ही तर पालकांची पुण्याई!

‘नशीबच फुटके, त्याला कोण काय करणार?’ असे म्हणतात. खरे तर काही लोकांचे नशीब बलवान असल्यामुळे व जन्मताच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जगात प्रवेश केलेल्या या महाभागांना सर्व काही मिळते. डॅडी बाबूशच्या पुण्याईवर रोहित मेयर बनले. पती प्रेमामुळे जेनिफर मंत्री बनल्या. पतीच्या पुण्याईवर एलिना आमदार बनल्या. पापा चर्चिलच्या प्रेमाने उद्या वालंका कदाचित आमदार बनेल. पापा ज्योकिमच्या पुण्याईच्या बळावर कदाचित युरी आमदार होईल. पतीच्या कर्तृत्वाने कदाचित दिलायला, दिव्या, सावित्री आमदार बनतील. झेंडे नाचविणारे व पक्षासाठी सर्वस्व पणाला लावणारे कार्यकर्ते मात्र पालकांची पुण्याई नसल्यामुळे पालखीचे भोईच होऊन राहतील. ‘दाने दाने पर लिखा है, खानेवाले का नाम’ म्हणतात ते खरेच. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com