Goa Politics: 'कळंगुट'सोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य

Goa Assembly Election 2027: माझ्या मतदारसंघातील लोकांना मी नको असेन तर मी मांद्रे मतदार संघातून निवडणूक लढवेन, असे सूचक वक्तव्य कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केले.
Goa Politics: कळंगुटसोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य
Michael Lobo Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Election 2027

म्हापसा: गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून दोन वर्षांचा अवधी आहे. राज्यात बहुमातातील भाजप सरकार कार्यरत असताना आगामी निवडणुकीत राज्यातील लढतीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. याबाबत सूचक वक्तव्य कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केलंय. लोबो यांनी थेट दुसऱ्या मतदारसंघातून लढण्याबाबत भाष्य केले आहे.

"गोवा विधानसभेसाठी दोन वर्ष शिल्लक असताना त्याबाबत काही भाष्य करणे घाईचे होईल. आमदारांनी त्यांचे काम करावे. माझ्या मतदारसंघात देखील अनेक कामं शिल्लक आहेत. मांद्रे मतदारसंघातील नागरिक ठरवतील त्यांचा पुढचा आमदार कोण असेल? माझ्या मतदारसंघातील लोकांना मी नको असेन तर मी मांद्रे मतदार संघातून निवडणूक लढवेन", असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले.

Goa Politics: कळंगुटसोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य
Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

दरम्यान, सध्या मांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाचे जीत आरोलकर आमदार आहेत. आरोलकर यांचा पक्ष भाजपसोबत सत्तेत आहे. मगोचे सुदीन ढवळीकर सावंत सरकारमध्ये वीज खात्याचे मंत्री आहेत. लोबो यांनी २०२७ मध्ये मांद्रेतून निवडणूक लढवल्यास आरोलकरांचे भवितव्य काय असेल? याबाबत राजकीय पटलावर तर्कवितर्क लावले जात आहेत.

दीपक ढवळीकर २०२७ मध्ये प्रियोळमधून लढणार?

मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी प्रियोळ मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. २०२७ ची विधानसभा नक्की लढणार. चार मतदारसंघापैकी एका मतदारसंघात मी असेन, असे वक्तव्य ढवळीकरांनी केले आहे.

प्रियोळ मतदारसंघात सध्या क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे येथील देखील लढतीचे गणित बदलणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com