IFFI Goa 2024: "गोव्यात आलो.. पण इफ्फीपर्यंत पोहोचावं कसं?" हे आहेत उत्तर-दक्षिण गोवा ते पणजीचे काही सोपे मार्ग

IFFI Venue Road Map: पहिल्या दिवशी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मैदानावर या सोहळ्याचे उद्घाटन होईल, मात्र या सोहळ्याला गोव्याच्या विविध भागांमधून कसं पोहोचता येईल हे आज थोडक्यात जाणून घेऊया.
IFFI Venue Road Map: पहिल्या दिवशी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मैदानावर या सोहळ्याचे उद्घाटन होईल, मात्र या सोहळ्याला गोव्याच्या विविध भागांमधून कसं पोहोचता येईल हे आज थोडक्यात जाणून घेऊया.
How to Reach IFFI VenueDainik Gomantak
Published on
Updated on

How to Reach an International Film Festival Of India (IFFI Goa) Venue

पणजी: गोवा सध्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीत पूर्णपणे रंगून गेलाय. केवळ भारतातीलच नाही तर विदेशातील अनेक देशांमधून चित्रपट प्रेमी या निमित्ताने गोव्यात हजेरी लावणार आहेत. 20 नोव्हेंबर पासून सुरु होणारा हा सोहळा 28 नोव्हेंबर पर्यंत देश-विदेशातील चित्रपट प्रेमींचे मनोरंजन करणार आहे.

पहिल्या दिवशी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मैदानावर या सोहळ्याचे उद्घाटन होईल, मात्र या सोहळ्याला गोव्याच्या विविध भागांमधून कसं पोहोचता येईल हे आज थोडक्यात जाणून घेऊया. इफ्फीचा आनंद घ्यायचा असेल तर शामाप्रसाद मुखर्जी मैदानाशिवाय आयनॉक्स पणजी,पर्वरी, रवींद्र भवन फातोर्डा, मिरामार इत्यादी स्थळं महत्वाची आहेत हे लक्षात घ्या.

गोव्यात कसे पोहोचाल? ( How to Reach Goa)

इफ्फीला पोहोचायचं असेल तर पणजी हे प्रमुख शहर आहे, त्यामुळे तुम्ही उत्तर गोव्यातील मोपा विमानतळ किंवा थिवी रेल्वे स्थानकावरून पणजीपर्यंतचा प्रवास करू शकता आणि जर का दक्षिण गोव्याहून पणजीला जाणार असाल तर दाबोळी विमानतळ किंवा मडगाव रेल्वे स्थानकावरून पणजीपर्यंत प्रवास करता येतो. याशिवाय जुने गोवे किंवा ओल्ड गोव्यातील करमळी रेल्वेस्थानक हा देखील एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

उत्तर गोव्यातून पणजीला कसं जायचं?

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पणजी (Mopa to Panjim)

उत्तर गोव्यात जर का विमानाने आला असाल तर मोपा आंतराष्ट्रीय विमानतळावरून म्हणजेच पेडण्याहून पणजीपर्यंत प्रवास करावा लागेल. मोपा ते पणजीचे अंतर सुमारे 35-40 किमी आहे आणि साधारण एका तासाभरात हे अंतर पार करता येतं.

मोपाहून स्वतःची गाडी घेऊन पणजीला जाणार असाल तर NH66 चा वापर करा. या रस्त्यावरून जात असताना मोपा विमानतळावरून तुम्हाला सर्वात आधी म्हापसा शहरात यावं लागेल आणि नंतर पर्वरीमार्गे पणजीला जाणं सहज शक्य आहे.

IFFI Venue Road Map: पहिल्या दिवशी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मैदानावर या सोहळ्याचे उद्घाटन होईल, मात्र या सोहळ्याला गोव्याच्या विविध भागांमधून कसं पोहोचता येईल हे आज थोडक्यात जाणून घेऊया.
IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

स्वतःची गाडी नसल्यास काही विशेष कष्ट घ्यावे लागणार नाहीत, विमानतळावरून म्हापसा बसस्थाकावर पोहोचल्यानंतर केवळ अर्ध्या तासात बसने पणजीला पोहोचणं शक्य आहे. बसचा पर्याय नको असल्यास तुम्ही रेंटल टॅक्सी किंवा गाडी घेऊ शकता.

जुने गोवे (करमळी) ते पणजी (Karmali Railway Station To Panjim)

जुने गोवे ते पणजी हा प्रवास तसा सोपा आहे, कारण दोन्ही शहरांमधलं अंतर फार जास्ती नाही. केवळ 12 किमीचं हे अंतर 20 मिनिटांत पूर्ण करता येतं. जुन्या गोव्याहून पणजीला जाताना पणजी फर्मागुडी मडगाव महामार्गाचा वापर करा.

गाडी घेऊन आला नसला तर करमळी रेल्वे स्थानकापासून गांधी सर्कल पर्यंत पोहोचावं लागेल आणि इथून पुढे बस किंवा रेंटल गाड्यांची मदत घेता येते.

दक्षिण गोव्याहून पणजीला कसं पोहोचाल?

मडगाव रेल्वेस्थानक ते पणजी (Magdaon to Panjim)

दक्षिण गोवा ते पणजी हा प्रवास काहीसा दूर असू शकतो, कारण यात तुम्हाला 35 किमी अंतर पार करावं लागेल. मडगाव रेल्वे स्थानकापासून पणजीला येत असाल तर पुन्हा एकदा NH66 हाच रास्ता महत्वाचा ठरतो. हा रास्ता नुवे, नागवे, कुठ्ठाळीमार्गे तिसवाडीला जातो, इथे तुम्ही पणजी शहरात प्रवेश करता.

रेंटल गाडीने जाणार असाल तर हाच मार्ग निवडा मात्र बसने जायचा विचार करत असाल तर मडगाव बसस्थानक ते पणजी बसस्थानक असा किमान एका तासाचा प्रवास करावा लागेल.

दाबोळी विमानतळ ते पणजी (Dabolim to Panjim)

दाबोळी विमानतळावरून गाडीने पणजीला जात असताना चिखलाचा मार्ग धरा. पुढे नवीन झुआरी पुलावरून तुम्ही थेट तिसवाडी तालुक्यात पोहोचणार आहात. पणजी शहरापर्यंत पोहोचण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रस्त्याने थेट दुर्गवाडी पर्यंत जावं लागेल आणि इथून पुढे मात्र तुम्ही पणजीत सहज पोहोचाल. हा एकूण प्रवास40 मिनिटांमध्ये पूर्ण करता येतो.

रेंटल गाडी घेऊन जाणार नसाल तर बसने जाण्यासाठी चिखली जंक्शनपर्यंत पोहोचावं लागेल आणि इथून पुढे एका तासात पणजी गाठता येतील.

इफ्फीच्या इतर महत्वाच्या स्थळांवर कसे पोहोचाल? (How to Reach IFFI Vanue)

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मैदान, आयनॉक्स पणजी, एंटरटेनमेंट सोसायटी, मॅक्विनेझ पॅलेस थिएटर किंवा मिरामार ही सर्व ठिकाणं पणजी शहरात आहेत त्यामुळे दयानंद बांदोडकर मार्गाचा वापर करून या ठिकाणांवर केवळ 5 मिनिटांमध्ये पोहोचता येतं मात्र बसने जाणार असाल तर पणजी बस्थानकावरून कदंबा किंवा खासगी बसचा प्रवास करावा लागेल. पणजी बसस्थानकावर तुम्हाला रिक्षा किंवा टू -व्हीलरच्या सेवा देखील सहज मिळतात.

IFFI Venue Road Map: पहिल्या दिवशी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मैदानावर या सोहळ्याचे उद्घाटन होईल, मात्र या सोहळ्याला गोव्याच्या विविध भागांमधून कसं पोहोचता येईल हे आज थोडक्यात जाणून घेऊया.
IFFI Goa 2024: दिग्गजांकडून मार्गदर्शनाची संधी!! Creative Minds Of Tomorrow अंतर्गत नवख्या चित्रपट निर्मात्यांना खास प्रशिक्षण

आयनॉक्स पर्वरीला जाणार असाल तर अटल सेतूने जा आणि पर्वरी शहरात पोहोचल्यानंतर सर्कल कडून उजव्या बाजूने वळा, आता डाव्या बाजूने तुम्हाला मॉल दि गोवा दिसेल आणि मडगावला जाणार असाल तर पुन्हा आगाशे, कुठ्ठाळी, नागवे, नुवेमार्गे फातोर्डा गाठा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com