Madgao District Hospital: रक्त तपासणीत होणाऱ्या विलंबामुळे रुग्ण त्रस्त; लवकरच अत्याधुनिक उपकरणांची सोय करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा निर्णय!!

Vishwajeet Rane Goa: मडगाव हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणांसह अद्ययावत करण्याची योजना.
Vishwajeet Rane Goa:  मडगाव हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणांसह अद्ययावत करण्याची योजना.
Madgao District HospitalDainik Gomantak
Published on
Updated on

Madgao District Hospital South Goa

मडगाव: गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अचानक दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि दरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी प्रमाणेच मडगाव हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणांसह अद्ययावत करण्याची योजना जाहीर केली आहे.

मडगाव मधील रुग्णांना रक्त तपासणीसाठी दिवस आणि आठवडे वाट पाहावी लागत असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे आणि म्हणूनच आरोग्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आलाय.

रुग्णांच्या मते रक्त तपासणीला एवढा वेळ लागणं हे बरोबर नाही. रक्त तपासणी केल्यानंतर डॉक्टर त्यानुसार निदान करून औषध देतात आणि प्राथमिक रक्त तपासणीतच असा वेळ वाया जात असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.

शिवाय सरकारी हॉस्पिटलमध्ये होणार हा उशीर पाहता रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत रक्त तपासणी करण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहत नाही. ही परिस्थिती जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली असता रुग्णांना रक्त नमुने तपासणीसाठी दिल्या जाणाऱ्या लांबलचक तारखांवर प्रकाश टाकण्यात आला.

Vishwajeet Rane Goa:  मडगाव हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणांसह अद्ययावत करण्याची योजना.
Nave Utsav: ४०० वर्षांची परंपरा लाभलेला 'नवे उत्सव' उत्साहात साजरा! मये, वायंगिणी आणि डिचोली ग्रामस्थांचा सहभाग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com