IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Goa IFFI 2024: आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला आणि सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला इफ्फी चित्रपट महोत्सव येत्या २० नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होतोय. हा ५५ वा चित्रपट महोत्सव २८ तारखेपर्यंत सुरु असणार आहे.
IFFI 2024 Schedule, IFFI 2024 Venue, Iffi 2024 Opening Ceremony
IFFI 2024 InformationDainik Gomantak
Published on
Updated on

Guide to IFFI 2024 Events and Venues

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला आणि सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला इफ्फी चित्रपट महोत्सव येत्या २० नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होतोय. हा ५५ वा चित्रपट महोत्सव २८ तारखेपर्यंत सुरु असणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील महत्वाचे दिग्दर्शक शेखर कपूर या महोत्सवाचे संचालक आहेत.

मायकल ग्रेसी यांच्या ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने या महोत्सवाचा पडदा उघडणार असून, इंडियन पॅनोरमा विभागात रणदीप हुड्डा अभिनित व दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा उद्घाटनाचा चित्रपट असणार आहे. यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे यॉट्सवरती होणारे विशेष कार्यक्रम. चित्रपट तंत्रसंदर्भातील विशेष सत्रे आणि इफ्फीचे काही मास्टरक्लास या यॉटवरती होणार आहेत.

यावर्षी कंट्री ऑफ फोकस ऑस्ट्रेलिया असून ऑस्ट्रेलियाचे फिल्ममेकर फिलीप नॉयस यांना यावर्षीचा सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता रणबीर कपूर शोमन स्व. राज कपूर यांच्या आठवणीना उजाळा देणार आहे.

यावर्षीच्या इफ्फीमध्ये 101 देशांमधून अर्जसादर झालेले असून 180 हून अधिक चित्रपट या महोत्सवात सादर होणार आहेत. सिनेप्रेमींनीही यावर्षीच्या महोत्सवास विक्रमी नोंदणी केली आहे. हे आकडे या महोत्सवाचे महत्व अधोरेखित करतात. या महोत्सवात कुठे कुठे आणि काय काय पाहता येईल याची माहिती घेऊ.

उद्घाटन आणि समारोप समारंभ

इफ्फीचा उद्घाटन आणि समारोप समारंभ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृह, ताळगाव येथे होणार आहे. ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने या महोत्सवाचा पडदा उघडणार असून 'ड्राय सीझन' ही समारोपाची फिल्म असणार आहे. 'यंग फिल्ममेकर्स – द फ्युचर इज नाऊ' ही यावर्षीच्या इफ्फिची थीम आहे.

स्क्रीनिंगची ठिकाणे

यावर्षी दोन थिएटर्समध्ये सहा अतिरिक्त स्क्रीनवर चित्रपटांचे आयोजन केलेले आहे. चार स्क्रीन्स आयनॉक्स मडगाव येथे तर इतर दोन स्क्रीन्स आयनॉक्स फोंडा येथे आयोजित केल्या आहेत. इथे सर्व चित्रपटांचा आस्वाद घेता येईल. या महोत्सवामध्ये आयनॉक्स पणजी, मॅक्वीनेज पॅलेस, आयनॉक्स पर्वरी, आयनॉक्स मडगाव, झेड स्क्वेअर आणि आयनॉक्स फोंडा या ठिकाणी इफ्फीतील सिनेमे पाहता येतील.

मास्टरक्लास आणि खुली सत्रे

सदर महोत्सवात होणारी खुली सत्रे आणि मास्टरक्लास हे कला अकादमी येथे होतील. पूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे कला अकादमीत कोणतेही स्क्रीनिंग होणार नाही. यावर्षी ए. आर. रेहमान, शबाना आझमी, जॉनी सील, मणीरत्नम, अनुपम खेर या तज्ञांचे मास्टरक्लास तसेच खुली सत्रे असणार आहेत.

फिल्म बझार

18 व्या फिल्म बझारमध्ये 350 हून अधिक सिनेमांची पर्वणी असणार आहे. जैरोम पिलार्ड हे फिल्म बझारचे सल्लागार आहेत. तसेच नॉलेज सिरीजमध्ये लेखन, चित्रपट निर्मिती, वितरण याविषयीच्या कार्यशाळांचा सहभाग असेल.

इंडियन पॅनोरमा

इंडियन पॅनोरमा विभागात आपल्या देशातील संस्कृतीचे आणि भाषिक विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट असतात. एकूण 25 चित्रपट आणि 20 नॉन-फीचर चित्रपट या विभागात दाखवले जातील. या विभागात उदघाटनाचा चित्रपट रणदीप हुडा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' दाखवला जाईल तर कथाबाह्यपट 'घर जैसा कुछ' हा आहे.

चित्रपटांबद्दल

यावर्षीच्या इफ्फीमध्ये 15 जागतिक, 40 आशियाई प्रीमियर तसेच106 भारतीय प्रीमियर्ससह 180 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट सादर केले जातील. यामध्ये जवळपास 81 देशांमधील पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा समावेश आहे. सिनेरसिकांसाठी ही एक पर्वणीच आहे.

गोल्डन पीकॉक अवॉर्ड

इफ्फीतील महत्वाच्या गोल्डन पीकॉक अवॉर्डसाठी 15 आंतरराष्ट्रीय आणि भारतीय फिक्शन फिचर फिल्म्स स्पर्धा करतील. यामध्ये 12 सिनेमे परदेशी आहेत. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, नॉर्वे, ऑस्ट्रिया, चीन या महत्वाच्या देशांमधील सिनेमे यात समाविष्ट आहेत.

IFFI 2024 Schedule, IFFI 2024 Venue, Iffi 2024 Opening Ceremony
IFFI 2024: 'इफ्फी'त रॉकस्टार! राज कपूर यांच्या आठवणींना 'रणबीर' देणार उजाळा, तारीख आणि वेळ जाणून घ्या

इफ्फीची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली असून या महोत्सवाची माहिती, यात येणारे कलाकार, निवड झालेले सिनेमे जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर महोत्सव प्रवेशसुलभ करण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. स्वयं या संस्थेला याबाबतीत भागीदार म्हणून नेमलेले आहे. हा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजे समृद्ध सांस्कृतिक अनुभवाची हमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com