Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

Cruz Silva Subsidized Fertilizer App: अनुदानित खते मिळवण्यासाठी केवळ ॲपचाच पर्याय ठेवल्यास शेतकऱ्यांची विनाकारण गैरसोय होईल, असे ते म्हणाले.
Cruz Silva Subsidized Fertilizer App
Goa Farmers Fertilizer Mobile AppDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी कृषी विभागाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ या मोबाईल ॲपद्वारेच अनुदानित खते खरेदी करणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

सिल्वा म्हणाले की, पारदर्शकता आणणे व अनुदानित खतांचा गैरवापर रोखणे ही उद्दिष्टे कौतुकास्पद असली, तरी सरकार गोव्यातील शेतकरी वर्गासमोरील वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सरकारने हे समजून घेतले पाहिजे की, अनेक शेतकरी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत किंवा मोबाईल ॲप्लिकेशन्स वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल साक्षरतेचे ज्ञानही नाही.

Cruz Silva Subsidized Fertilizer App
Goa Crab Farming: खेकडे पालन प्रकल्‍पांसाठी मिळणार 50 टक्‍के सबसिडी; सरकारकडून नवी योजना, मत्‍स्‍योद्योग खात्‍याकडून अधिसूचना जारी

अनुदानित खते मिळवण्यासाठी केवळ ॲपचाच पर्याय ठेवल्यास शेतकऱ्यांची विनाकारण गैरसोय होईल, असे ते म्हणाले. शेतकरी आधीच अनिश्चित हवामान, शेतीचा वाढता खर्च आणि मजुरांची कमतरता या समस्यांशी झुंज देत आहेत. अशावेळी सरकारने त्यांच्यासमोर आणखी एक अडथळा निर्माण करू नये.

तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचे जीवन सुलभ केले पाहिजे; आवश्यक कृषी सुविधा मिळवण्यात ते अडथळा ठरू नये. केवळ स्मार्टफोन नसल्यामुळे किंवा मोबाईल ॲप्लिकेशन वापरता येत नसल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला अनुदानित खतांपासून वंचित ठेवले जाऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा मांडत राहणार, जेणेकरून गोव्यातील कोणताही खरा शेतकरी अनुदानित खतांपासून वंचित राहणार नाही, असेही आमदार सिल्वा यांनी सांगितले.

Cruz Silva Subsidized Fertilizer App
Goa Agriculture: पावसाच्या सरींनी फुलली शेतकऱ्यांची आशा; डिचोलीत शेतीकामे सुरू, कृषी खातंही सज्ज

‘ऑफलाइन’ पर्यायही उपलब्ध करावा

सिल्वा यांनी कृषी विभागाला आवाहन केले की, जे शेतकरी हे ॲप वापरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी त्वरित ‘ऑफलाइन’ पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच, जोपर्यंत ही डिजिटल प्रणाली सर्वांसाठी पूर्णपणे सुलभ होत नाही, तोपर्यंत अधिकृत खतविक्री केंद्रे आणि कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये नोंदणी व बुकिंगची सुविधा सुरू ठेवावी. त्यांनी सरकारला ग्रामस्तरावर जनजागृती शिबिरे आयोजित करण्याचे, खतविक्री केंद्रांवर पुरेसा कर्मचारीवर्ग तैनात करण्याचे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कोणत्याही त्रासाशिवाय वेळेवर खत मिळेल, याची खात्री करण्याचे आवाहनही केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant Krishi Pe Charcha
Goa Motorcycle Pilots
Goa School Enrollment
Goa Government Primary Schools
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com