Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Heavy rainfall in Goa: गेल्या चार-पाच दिवसांपासून कहर केलेल्या पावसाचा रौद्रावतार कायम असून, डिचोलीत सर्वत्र मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. दोन दिवसांच्या तुलनेत पावसाची धार किंचित कमी झाल्याचे जाणवले.
Rain Damage
Rain DamageDainik Gomantak
Published on
Updated on

Goa faces intense rainfall for five days: गेल्या चार-पाच दिवसांपासून कहर केलेल्या पावसाचा रौद्रावतार कायम असून, डिचोलीत सर्वत्र मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. पावसाचा जोर कायम असला, तरी गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाची धार किंचित कमी झाल्याचे जाणवले.

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासांत अतिवृष्टीच्या धोक्याची शक्यता गृहीत धरून आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. पाऊस आणि वादळीवाऱ्याच्या तडाख्यात झाडांची पडझड सुरूच आहे. काल आणि आज मिळून दोन दिवसांत डिचोली परिसरात दहाच्या आसपास झाडे कोसळली. या पडझडीत लाखो रुपयांची हानी झाली असून, सुदैवाने जीवितहानीसारखा अनर्थ टळला आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, कोसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील ‘तिळारी’ धरणातील जलसाठा अचानक वाढू लागला आहे. पुढील चोवीस तास जोरदार पावसाचा कहर सुरूच राहिला, तर कदाचित तिळारीतून जलविसर्ग होण्याचा धोका आहे. तशी शक्यता गृहीत धरून महाराष्ट्रातील पाटबंधारे खाते सतर्क झाले असून, तिळारीच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तिळारीतून जलविसर्गाचा धोका असला, तरी अजूनतरी जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही.

अतिवृष्टी झाल्यास पुराच्या आपत्तीची शक्यता

बुधवारी कोसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला होता. सायंकाळी डिचोलीतील वाळवंटीसह अस्नोडा येथून वाहणारी ‘पार’ नदी तसेच गावागावांतील नद्यांची पातळी अचानक वाढली होती. वाळवंटी नदी फुटते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, काल (बुधवारी) रात्री पावसाचा जोर किंचित कमी झाल्याने नद्या नियंत्रणात आल्या. त्यामुळे तूर्त पुराचा धोकाही टळला. सध्या सर्वत्र जलमय स्थिती कायम असून, अतिवृष्टी झालीच तर पुराची आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘कुशावती’ नदी भरली

बुधवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळे कुशावती नदीला पूर आल्याने गुरुवारी सकाळी पारोडा पूल व केपे ते मडगाव हा मुख्य रस्ता पारोडा येथे पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली आहे.

सुरावलीतील रेल्वे भुयारी रस्ता पाण्यात

गेल्या दोन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे सुरावलीतील रेल्वे भुयारी रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील लोकांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास जाणवू लागले आहेत.

म्हार्दोळात झाड कोसळून घरांसह दुचाकींचे नुकसान

सीमेपाईण-म्हार्दोळ भागात एक भले मोठे झाड दोन घरांवर पडल्याने घरातील लोकांना सुमारे चार तास अडकून पडावे लागण्याची घटना गुरुवारी (ता.३) पहाटे ४ वा.च्या सुमारास घडली. रात्री घरातील लोक साखरझोपेत असताना अचानक घराजवळील आंब्याचे झाड या दोन्ही घरांवर कोसळले. त्यात घरांचे आणि घरासमोर पार्क करून ठेवलेल्या दोन दुचाकींचे नुकसान झाले.

भुईपाल कॉलनी येथे झाड पडून ६५ हजारांचे नुकसान

गेल्या दोन दिवसांपासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे होंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या भुईपाल कॉलनी येथील बबिता विठू पावणे यांच्या घरावर गुलमोहरचे झाड पडून सुमारे ६५ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती होंडा पंचायतीचे तलाठी संतोष गावस यांनी दिली आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, सत्तरी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी झाडांची पडझड झालेली आहे. त्याचप्रमाणे गुरुवार, ३ रोजी पहाटे ५ वा. भुईपाल कॉलनी येथे राहणाऱ्या बबिता पावणे यांच्या घराच्या बाजूला असलेले गुलमोहराचे झाड उपटून, त्यांच्या घराच्या एका बाजूवर कोसळले. यामध्ये त्या घराचे नुकसान झाले आहे. हे झाड एका बाजूलाच पडले असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती वाळपई अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने ते झाड कापून बाजूला केले. या घटनेचा पंचनामा होंडा पंचायतीचे तलाठी संतोष गावस यांनी केला असून, राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याकडे पाठवला जाणार आहे.

Rain Damage
Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

बोरीत नाला स्वच्छ केल्याने पाणी मार्गी

बोरी-शिरोड्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. गुरुवार, ३ रोजी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या भागातील शेतीतही पाणी साठून राहिले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात साकवार, कोपले, देऊळवाडा आदी भागातून जाणाऱ्या नाल्यांतून सिद्धनाथ पर्वत परिसरातून वाहून येणारे पावसाचे पाणी नवदुर्गा तलावात साठून राहून ते कोपले, पेडाकडील शेतीतून वाहत होते व हमरस्त्यावर पाणी येऊन वाहतुकीस व्यत्यय येत होता. ही दरवर्षाची समस्या लक्षात घेऊन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी मे महिन्यापूर्वी येथील मुख्य नाल्यातील गाळ काढून नाला स्वच्छ करून घेतल्यामुळे आता पावसाचे पाणी कुठेच तुंबून न राहता सरळ तामशिरे भागातून झुआरी नदीच्या पात्रात जात आहे.

Rain Damage
Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

आमोण्यात झाडांच्या पडझडीमुळे वीज खंडित

मागील आठवड्यापासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे तसेच सुसाट्याच्या वाऱ्यामुळे सुरुवातीला चारीवाडा-आमोणा येथील चिंचेचे झाड, आंबेशी येथे आंब्याचे झाड नंतर सावंतवाडा येथे आंब्याचे झाड वीजतारांवर कोसळून वीज खंडित झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com