मडगाव: बाणावली आणि उसगाव येथे घडलेल्या बलात्काराची प्रकरणे ताजी असतानाच केपे (Quepem) येथेही एका 20 वर्षीय आसामी (Assam) युवतीवर बलात्कार होण्याची घटना घडली असून या युवतीला नोकरी देण्याच्या बहाण्याने गोव्यात (Goa) आणले होते, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणात केपे पोलिसांनी सुधाकर नाईक (वय 62) या कुडचडेच्या एका व्यावसायिकासह शंभुनाथ सिंग (वय 32) या दिल्लीच्या युवकाला अटक केली आहे. (Girl from Assam was raped in Goa)
मिळालेल्या माहितीनुसार, शंभूनाथ या दिल्लीच्या युवकाने त्या आसामी युवतीला गोव्यात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने आणले होते. या युवकाच्या बहिणीचा फ्लॅट केपे येथे असून तो त्या युवतीसह तिथे 26 तारखेला आला होता. युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार त्या युवकाने त्या दिवशी दोन वेळा तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर 28 रोजी तो युवक सुधाकर नाईक या कुडचडेच्या व्यावसायिकाला घेऊन त्या फ्लॅटवर आला. त्याने त्या युवतीला दारू पाजून त्या व्यावसायिकडे शरीरसंबंध ठेवण्याची बळजबरी केली.
युवतीकडूनच माहिती
त्या युवतीने त्याही अवस्थेत आपल्यावर केल्या जाणाऱ्या अतिप्रसंगाचे मोबाईलवर चित्रीकरण करून नंतर 100 नंबर डायल करून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान काल फेसबूकवरील मैत्रीचा फायदा उठवत पेडणे येथील एका युवतीला उसगावात बोलाविले आणि त्यानंतर तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 19 वर्षीय युवतीशी उस्मान सय्यद याने फेसबूकवरून मैत्री केली. फेसबूकवरील फ्रेंड रिक्वेस्ट पीडित युवतीने स्वीकारल्यानंतर दोघांतही चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर उस्मानने आपला मोबाईल क्रमांक त्या युवतीला दिल्यानंतर त्यांच्यात थेट बोलणी व्हायला लागली. या बोलण्यातूनच उस्मानने त्या युवतीला भेटायला बोलावले. पीडित युवतीची एक मैत्रीण उसगावात राहत असल्याने तिला उसगाव परिचित होते, त्यामुळे भेटीचे ठिकाण उसगाव निश्चित करण्यात आले.
दरम्यान मागील आठवड्यात सगावात युवतीवर दोघाजणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या दोन्हीही संशयितांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या कारगाडीच्या काचांवर काळी फिल्मिंग केली असल्याने गुन्ह्यासाठीच या गाडीचा वापर होत होता काय?, यापूर्वी अन्य गुन्हे या कारगाडीतून झाले आहेत काय?, याचा तपास फोंडा पोलिस करीत आहेत. उसगावातील या बलात्कार प्रकरणातील दोघाही संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.