Goa Rape Case: पीडितेच्या पालकांना दोष नकाे

पीडितांच्या पालकांना नव्हे तर गुन्हेगारांच्या पालकांना दोष द्यायला हवा.
Goa Rape Case
Goa Rape CaseDainik Gomantak

पणजी: बाणावलीतील (Benaulim) सामूहिक बलात्काराच्या (Rape case) घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Cm Pramod Sawant) यांनी त्यांच्या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मात्र राज्यातील महिला (Women) संघटनांचे या स्पष्टीकरणाने समाधान झालेले नाही. संघटनांच्या सदस्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Parents of perpetrators should be blamed about Goa Rape Case)

याबाबत अर्ज या संस्थेच्या समन्वयक ज्युलियाना लोहार म्हणाल्या, पीडितांच्या पालकांना नव्हे तर गुन्हेगारांच्या पालकांना दोष द्यायला हवा. लोकांच्या सुरक्षेची खास करून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. पीडितांच्या पालकांना दोष देऊन किंवा त्यांच्यावर आरोप करून आम्ही प्रत्यक्षात पीडितांनाच दोष देऊन त्यांची लज्जास्पद परिस्थिती करून टाकतो.

Goa Rape Case
गोव्यासारख्या सुशिक्षित राज्याचे मुख्यमंत्री मुलींबद्दल काय बोलतात पाहा

जरी रात्री उशिरा पालकांशिवाय अल्पवयीन मुलींनी बाहेर जाऊ नये हे मान्य असले, तरी अशा लैंगिक गुन्ह्यांचे मूळ कुठे दडले आहे यावर विचार व्हायला हवा, असे मत गोवा महिला मंचाच्या निमंत्रक लाॅर्ना फर्नांडिस यांनी व्यक्त केले. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवू पाहणाऱ्या विधानांचा मंच निषेध करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

अशा प्रकारच्या लैंगिक गुन्ह्यांमागे जी कारणे दडली आहेत त्यात एस्कॉर्ट सर्व्हिस वेबसाइट्स आणि सेक्स टुरिझम यांचाही समावेश आहे. सरकारने त्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Goa Rape Case
Goa Gangrape Case: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानावरुन कॉंग्रेस आक्रमक

सोशल मीडियावर पडसाद

मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे सोशल मीडियावरही मोठे पडसाद उमटले असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गृह खात्याकडे चलन देण्यासाठी एका जागी ठेवण्यास पंधरा-वीस पोलिस असतात, पण खास करून किनारपट्टीवर रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी पोलिस नसतात का, असा सवाल काहीनी प्रतिक्रिया व्यक्त करताना केला आहे. तर काहींनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना रात्रीच्यावेळी बाहेर फिरताना काळजी घ्यायला हवी, असे मत व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com