Maje Ghar Scheme: 350 कुटुंबांना मिळणार घरांची मालकी, राजेश फळदेसाई यांची मोठी घोषणा; हेडलॅण्ड, सडा येथील कुटुंबांना दिलासा

Goa Housing Ownership Rights: हेडलॅण्ड, सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीत राहणाऱ्या ३५० हून अधिक कुटुंबांना त्यांच्या सदनिकांची मालकी एका महिन्याच्या आत देण्यात येणार
Maje Ghar Scheme
Goa Housing Ownership RightsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: हेडलॅण्ड, सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीत राहणाऱ्या ३५० हून अधिक कुटुंबांना त्यांच्या सदनिकांची मालकी एका महिन्याच्या आत देण्यात येणार असल्याची घोषणा मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी केली. या घोषणेमुळे त्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या सदनिकांची मालकी त्या कुटुंबांना मिळावी यासाठी आमदार संकल्प आमोणकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या कुटुंबांनी आमदार आमोणकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार राजेश फळदेसाई यांचे आभार मानले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासूनचे आमचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याची भावना काहींनी व्यक्त केली. मालकी हक्क मिळाल्यानंतर आमच्यासमोर असलेल्या काही समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचेही त्या कुटुंबांनी स्पष्ट केले.

Maje Ghar Scheme
वय 84 , घरी 2 दिव्यांग मुली! कोरगावातील वृद्ध महिलेचे 'कुणी घर देता का घर'? चालता येत नसताना झिजवताहेत सरकारी कार्यालयाचे उंबरठे

सरकारने अलिकडेच झुआरीनगर येथील ४८ कुटुंबांच्या नावावर ते राहत असलेल्या जागेची मालकी हस्तांतरित केली होती. झुआरीनगर येथे १९८१ साली आग लागल्याने ४८ मजुरांच्या झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन सरकारने दखल घेत त्यांची व्यवस्था सरकारी जागेत केली होती. त्यांना काही चौरस मीटरचे भूखंड देण्यात आले होते. मात्र, त्या भूखंडांची मालकी त्यांच्या नावावर करण्यात आली नव्हती.

आता ‘माझे घर’ योजनेअंतर्गत त्या कुटुंबांच्या नावावर ती जागा करण्यात आली आहे. त्यासाठी ठरावीक रक्कम त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. यासाठी कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विशेष लक्ष घातले होते. त्याचप्रमाणे नवे वाडे येथील गोवा गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत गेली अनेक वर्षे राहणाऱ्या सुमारे ५४४ कुटुंबांना तेथील सदनिकांची मालकी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे.

Maje Ghar Scheme
Home Decor Tips: सगळे विचारतील, 'हे डिझाइन कोणी केलं?', तुमच्या घराला क्लासी बनवणाऱ्या सोप्या टिप्स

मुरगाव पालिका आणि मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणामधील दस्तऐवजांसंबंधी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्या कुटुंबांना सदनिकांची मालकी मिळणार आहे. आता हेडलॅण्ड, सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीतील सर्व कुटुंबांना त्यांच्या सदनिकांची मालकी मिळणार आहे. या वसाहतीत तारीवाडा-बोगदा येथे दरड कोसळून बेघर झालेल्या कुटुंबांना गोवा पुनर्वसन मंडळातर्फे सडा येथे एकमजली स्वरूपाची घरे देण्यात आली होती.

त्यानंतर महामार्गासाठी बायणा किनाऱ्यावरील ज्यांची घरे हटविण्यात आली होती, त्या कुटुंबांना बहुमजली इमारतींमध्ये सदनिका देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या सदनिकांची मालकी नसल्याने संबंधित कुटुंबांना काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तेथील इमारतींचीही दुर्दशा झाली आहे.

Maje Ghar Scheme
PM Narendra Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्‍टेंबरमध्‍ये गोव्‍यात; विकास प्रकल्पांची होणार पायाभरणी, CM प्रमोद सावंतांची माहिती

सदनिकाधारकांना मार्गदर्शन

मंगळवारी (ता. २) त्या कुटुंबांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आमदार राजेश फळदेसाई आणि आमदार संकल्प आमोणकर उपस्थित होते. त्या कुटुंबांना सदनिकांच्या मालकीसंबंधी अर्ज कसे भरावेत व ते कसे सादर करावेत, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. आमदार आमोणकर यांनी या प्रक्रियेविषयी माहिती दिली. तसेच प्रत्येक सदनिकाधारकाकडून केवळ एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याकामी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोठे सहकार्य लाभल्याचेही आमोणकर यांनी नमूद केले.

आमदार फळदेसाई यांनी या सदनिकांची मालकी लवकरात लवकर संबंधितांना मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com