वय 84 , घरी 2 दिव्यांग मुली! कोरगावातील वृद्ध महिलेचे 'कुणी घर देता का घर'? चालता येत नसताना झिजवताहेत सरकारी कार्यालयाचे उंबरठे

Chandravati Venji Home: एक वृद्ध महिला आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी गेली काही वर्षे ग्रामपंचायत व मामलेदार कार्यालयापासून पणजीपर्यंत विविध सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवून थकली आहे.
Chandravati Venji Home
Chandravati Venji HomeDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: ‘माझे घर’ही सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा सध्या राज्यात गाजावाजा होत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने माईण कोरगाव येथील एक वृद्ध महिला आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी गेली काही वर्षे ग्रामपंचायत व मामलेदार कार्यालयापासून पणजीपर्यंत विविध सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवून थकली आहे. ही व्यथा आहे माईण कोरगाव येथील चंद्रावती तुकाराम वेंजी या ८४ वर्षीय वृद्ध महिलेची.

पदरी दोन दिव्यांग मुली. पती तुकाराम वेंजी यांचे निधन होऊन पाच-सहा वर्षे झाली. घरात कोणीही कर्ता पुरुष नाही. पती तुकाराम हे मजुरी करून संसाराचा गाडा हाकायचे. पती असताना त्याने मातीचे घर बांधले होते. पण त्याच्या निधनानंतर आर्थिक स्थितीमुळे घर दुरुस्ती करणे शक्य झाले नाही.

घराच्या छपराचे वासे गेले आहेत, कौले फुटली आहेत. पावसाळ्यात घरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी गळते. जिथे गळती नाही, अशा ठिकाणी जेवण बनवणे, बसणे, उठणे व झोपायचे हा चंद्रावती आणि तिच्या दोन दिव्यांग मुलींचा दिनक्रम. घराजवळच डोंगर आहे.

Chandravati Venji Home
Mhaje Ghar: गोमंतकीयांना परवडणारे ‘माझे घर’ देणार! CM सावंतांचे आश्वासन; ‘गृहनिर्माण’कडून आराखड्याचे काम सुरू

या डोंगराची माती पावसाळ्यात स्वयंपाक करताना भांड्यांवर येऊन पडते. तर कधी जेवताना जेवणात पडते. छप्परही केव्हा कोसळून पडेल, हे सांगता येत नाही. चंद्रावती यांना धड उभेही राहता येत नाही. वृद्धावस्थेमुळे त्यांना काही वेळा सुचत नाही, मात्र आपले घर दुरुस्त व्हावे हे त्यांना पक्के माहीत आहे. कुणी घरात गेले तर चंद्रावती आपली व्यथा सांगतात.

Chandravati Venji Home
घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

आई गेल्यावर आमचे काय?

दिव्यांग शारदा म्हणाली, मीही अशी दिव्यांग त्यातच आजारपण. घर केव्हा कोसळेल, हे सांगता येत नाही. उद्या आई गेली, आम्हा बहिणींचे काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com