PM Surya Ghar Scheme: हरवळेतील 50 टक्क्यांहून अधिक घरांवर सोलर पॅनल; 'कार्बनमुक्त हरवळे'चे स्वप्न लवकरच साकार

PM Surya Ghar Solar Panels: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचा (पीएम सूर्यघर) हरवळेतील जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असून, आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घरांवर योजनेअंतर्गत सोलर पॅनलही बसविण्यात आले आहेत.
PM Surya Ghar Solar Panels
PM Surya Ghar SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचा (पीएम सूर्यघर) हरवळेतील जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असून, आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घरांवर योजनेअंतर्गत सोलर पॅनलही बसविण्यात आले आहेत. या योजनेमुळे ‘कार्बनमुक्त हरवळे’चे आमचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास सरपंच गौरवी नाईक यांनी व्यक्त केला.

याबाबत हरवळेचे स्वयंपूर्ण मित्र सतीश वायंगणकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळेतील नागरिकांच्या घरांवर सोलर पॅनल बसविण्यासाठी केएलके या एजन्सीची नेमणूक केली. या एजन्सीसोबत बैठका घेऊन आम्ही प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसविण्याचे निश्चित केले. त्यानुसार हे काम सुरू असून, आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घरांवर सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत.

PM Surya Ghar Solar Panels
Goa University: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पदव्या आता 'डिजिलॉकर'वर! गोवा विद्यापीठाचा 'नाड' प्रणालीत समावेश; कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रोत्साहनामुळे हरवळेतील घराघरांवर सोलर पॅनल बसविण्यात येत आहे, असे केएलके व्हेंचर प्रा. लि. कंपनीच्या प्रतिनिधी हिना शेख म्हणाल्या. सोलर पॅनलमुळे वीज बिलही वाढत नाही. त्याचा फायदा मिळेल, असा विश्वास बाबलो मळीक व संजय नाईक यांनी व्यक्त केला.

PM Surya Ghar Solar Panels
Goa Sport: FC गोवाला 'क' गटात स्थान; AFC चॅलेंज लीग मोहीम 17 ऑक्टोबरपासून कुवेतमध्ये

काय आहे योजना?

प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना असून, योजनेद्वारे नागरिकांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविले जातात.

याद्वारे दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळते व दरवर्षी १५ हजार रुपयांपर्यंत बचत होते.

सोलर पॅनल बसविण्यासाठी सरकार थेट बँक खात्यात पैसे जमा करते. घरात तयार केलेली अतिरिक्त वीज पुन्हा वीज कंपनीला विकता येते.

योजनेअंतर्गत १ किलोवॅट सिस्टमसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅट सिस्टमसाठी ६० हजार रुपये, तर ३ किलोवॅट किंवा त्याहून अधिक सिस्टमसाठी ७८ हजार रुपयांपर्यंतची सबसिडी मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com