Goa Crime : राज्यात दरमहा होताहेत सरासरी 4 खून

गुन्‍हेगारी वाढली : यंदा 8 महिन्यांतच 33 खूनप्रकरणांची नोंद
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime : राज्यात यावर्षी गेल्या आठ महिन्यांत 33 खूनप्रकरणांची नोंद झालेली आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. 2021 मध्ये याच काळात 13 खून झाले होते. त्यामुळे यावर्षी दरमहा सरासरी 4 खून घडले असून ही गंभीर समस्या आहे. 33 पैकी 29 खुनांचा छडा लागला आहे. 4 प्रकरणे अजूनही तपासाविना पडून आहेत. गेल्या दहा वर्षांत एका वर्षात 34 ही सर्वाधिक खुनांची प्रकरणे 2020 मध्‍ये नोंद झाली होती. यावर्षी 1896 गुन्हे नोंद झाले आहेत. या खुनांमधील मयत किंवा आरोपी हे 70 टक्के परप्रांतीय आहेत.

गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतल्‍यास वर्षभरात खुनाची प्रकरणे 34 वर गेली नव्हती. गेल्या वर्षी 2021 मध्‍ये 24 खून झाले. मात्र यावर्षी आठ महिन्यांतच ही संख्या 33 वर गेली आहे. 2017 साली 31, 2018 मध्ये 29, 2019 मध्ये 33, 2020 मध्ये 34 तर 2021 मध्ये 24 खुनाची प्रकरणे नोंद झालेली आहे.

यंदा खळबळ उडवून दिलेले प्रकरण म्‍हणजे अभिनेत्री तथा भाजप नेत्‍या सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाला शवचिकित्सेअंती हे प्रकरण खुनाचा गुन्हा म्‍हणून नोंद झाले. यातील मयत तसेच आरोपी हे परप्रांतीय आहेत. राज्‍यातील खूनप्रकरणांत क्वचितच मयत अथवा आरोपी हे गोमंतकीय आहेत. गेल्या पाच वर्षात नोंद झालेल्या एकूण 186 खूनप्रकरणांपैकी सुमारे 170 प्रकरणांचा तपास लागलेला आहे. त्यातील बहुतेक 90 टक्के प्रकरणांवर आरोपपत्र दाखल होऊन खटल्यावरील सुनावणी सुरू आहे.

ऑनलाईन पैसे गुंतविणे तसेच लॉटरी लागल्याच्या आमिषाने अनोळखी व्यक्तीने दिलेल्या बँक अकाउंटवर पैसे पाठवणे अशा अनेक तक्रारी सायबर कक्षाकडे नोंद होत आहेत. सध्या सुरू असलेल्या जमीन हडपप्रकरणी चौकशीत अनेक प्रकरणे उघड झालेली आहे. यावर्षी राज्यात फसवणुकीची 129 प्रकरणे नोंद झाली असून 88 प्रकरणांच्या तपास लागला आहे. गेल्या वर्षी याच काळात 59 प्रकरणे नोंद झाली होती तर 37 प्रकरणांचा तपास लागला होता.

Goa Crime News
Oli Leakage on Road : पणजी-फोंडा मार्गावर ऑईल गळती; अनेक वाहनांचा अपघात

गुन्‍हेगारीत गोवा सातव्‍या स्‍थानी

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार (एनसीआरबी) गोव्‍याचा गुन्हेगारीमध्ये देशात सातवा क्रमांक लागतो. सुमारे 15 लाख लोकसंख्या असलेल्या या राज्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांचा लोंढा मजुरीसाठी येत असल्याने गुन्हेगारी वाढत आहे. खून व बलात्‍कार या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे हे पोलिसांच्या हाती नाही असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लैंगिक अत्‍याचाराचीही प्रकरणे वाढली असून ती 55 वर गेली आहेत.

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असले तरी गोवा पोलिसांनी खून व बलात्कार अशा गुन्ह्यांचा ९० टक्के तपास लावण्यात यश मिळविले आहे. बहुतेक गुन्ह्यांचा तपास २४ ते ४८ तासांत लावण्यात आलाय. काही खूनप्रकरणे ही मजुरांमधील भांडणामुळे घडलेली आहेत. चोऱ्या व अपहरण प्रकरणांचा छडाही अवघ्‍या तासांत लावला आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक - शोबित सक्सेना यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com