Goa Crime News: अट्टल गुन्हेगार मारियासह दोघेजण गजाआड! पर्वरी पोलिसांची धडक कारवाई; संशयितांना 6 दिवसांची कोठडी

Porvorim Police Action Maria Baptista: राज्यातील विविध भागात दोन डझनपेक्षा अधिक घरफोड्या व चोऱ्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल गुन्हेगार मारिया सांतान बाप्तिसा (५४,बाणावली) याच्यासह दोघांना पर्वरी पोलिसांनी शिताफीने अटक केली.
Goa Crime News: घरफोड्या मारियासह दोघे गजाआड! पर्वरी पोलिसांची धडक कारवाई; संशयितांना 6 दिवसांची कोठडी
Goa Crime News Porvorim police action Maria BaptistaDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील विविध भागात दोन डझनपेक्षा अधिक घरफोड्या व चोऱ्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल गुन्हेगार मारिया सांतान बाप्तिसा (५४,बाणावली) याच्यासह दोघांना पर्वरी पोलिसांनी शिताफीने अटक केली. संशयितांना न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. चोरलेले दागिने व इतर किंमती वस्तू गोव्यातील काहींना विकल्याची माहिती दिली आहे. काहींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे मारिया बाप्तिसा व महम्मद सुफियान (२०, नावेली) अशी आहेत. सुफियान हा वाणिज्य शाखेचा प्रथमवर्ष विद्यार्थी आहे. मारिया याला यापूर्वी कोलवा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे नोंद आहेत तर काही प्रकरणांमध्ये न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Goa Crime News: घरफोड्या मारियासह दोघे गजाआड! पर्वरी पोलिसांची धडक कारवाई; संशयितांना 6 दिवसांची कोठडी
Goa Crime News: गॅस चोरीचा छडा लावताना पोलिसांच्या हाती लागले चोरट्यांचे टोळके; मंदिर आणि घरफोडी घटनांची दिली कबुली

यावर्षी मे ते सप्टेंबर याकाळात घरफोड्या व चोऱ्या करून संघटित टोळीने पोलिसांची झोप उडवली होती. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर गोव्यातील पणजी, पर्वरी, म्हापसा व हणजूण पोलिस स्थानकाने तपास पथके तयार करून या चोरट्यांचा शोध घेत होते. या तपासात अटकेतील गुन्हेगारांची माहिती मिळवल्यानंतर मारियाबाबत संशय वाढला. त्याला पर्वरी पोलिसांनी बाणावलीतून ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत नागाळी, बांबोळी, म्हापसा व शिवोलीतील घरफोड्यांमधील समावेश उघड झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com