Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

Goa Court: डाेक्‍यात दगड घालून त्‍यांचा खून करण्‍याचा आरोप असलेल्‍या अर्जुन काजीदोनी याला दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांनी दोषी ठरविले आहे.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दारुसाठी मित्रांकडून पैसे मिळत नसल्याच्या रागाने त्‍यांच्‍या डाेक्‍यात दगड घालून त्‍यांचा खून करण्‍याचा आरोप असलेल्‍या अर्जुन काजीदोनी याला दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांनी दोषी ठरविले आहे. शनिवारी (5 ऑक्टोबर) न्‍या. जोशी संशयिताची शेवटची बाजू ऐकून या संशयिताला शिक्षा ठोठावतील.

खूनाची घटना ३ फेब्रुवारी २०२० रोजी पहाटे १.३० वाजण्‍याच्‍या सुमारास मडगावच्‍या एसजीपीडीए मार्केट परिसरात घडली होती. संशयिताने आपलेच दोस्‍त असलेल्‍या भिमसी घिस्‍ती (३०) आणि मुटप्‍पा उर्फ रवी बडीगार (१९) या दोघांचा खून केला होता. तर सुनील सावंत नावाच्‍या अन्‍य एका व्‍यक्‍तीवर फुटलेल्‍या बाटलीने हल्‍ला करुन त्याला जखमी केले होते. या हल्ल्यात त्याचा जीव गेला असे समजून संशयिताने तेथून पळ काढला होता.

Court
Goa Crime News: अट्टल गुन्हेगार मारियासह दोघेजण गजाआड! पर्वरी पोलिसांची धडक कारवाई; संशयितांना 6 दिवसांची कोठडी

वाद विकोपाला

दारुच्‍या नशेतून हे सर्व प्रकरण घडले होते. एसजीपीडीए मार्केटाच्‍या जवळ असलेल्‍या एका बारमध्‍ये संशयित आणि त्‍याचे अन्‍य तीन मित्र दारु पिण्‍यासाठी आले होते. बार बंद झाल्‍यावर ते तिथेच शेकोटी पेटवून बसले होते. यावेळी आराेपी काजीदोनी हा झोपी गेला. झोपून उठल्‍यावर तो अकस्‍मात आपल्‍या मित्रांकडे दारु मागू लागला. दारु नसल्‍यास पैसे द्या असे म्‍हणत त्‍याने भांडण उरकून काढले. दारुच्‍या नशेत असतानाच त्‍याने दोन मित्रांच्‍या डोक्‍यात दगड घालून हा खून केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Panaji Cocaine Seizure Case
 Goa Marathi Film Festival 2026
Goa POCSO Court
adv rohit bras de sa amicus curiae
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com