Home Stay Policy अंतर्गत 2 लाख रूपये अनुदानासह स्वयंसहायता गटासाठी मदत करणार गोवा सरकार

पणजी येथे गोवा बाजार उभारणार
Goa Home Stay Policy
Goa Home Stay Policy Dainik Gomantak

Goa Govt on Home Stay Policy: गोवा सरकारने स्वयं-सहायता गटांसाठी (SHGs) अनेक सवलती जाहीर केल्या. यात 'होम स्टे' धोरणांतर्गत 2 लाख रुपये एकरकमी अनुदान आणि सरकारी सुविधांमध्ये कॅन्टीनचे वाटप यांचा समावेश आहे.

पणजीतून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हापसा येथे राज्य ग्रामीण विकास संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. स्वयंपूर्ण ई-बाजार योजनेंतर्गत बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मदत त्यांनी जाहीर केली.

Goa Home Stay Policy
Goa Tourism: गूगलवर 2023 मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप 10 पर्यटन स्थळांमध्ये गोवा 'या' नंबरवर

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, "देशभरातील बचत गटांना 'अच्छे दिन' येत आहेत कारण केंद्र सरकार निधी वितरित करणार आहे. राज्य सरकार बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी जागा निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.

आम्ही पणजी येथे गोवा बाजार उभारत आहोत. येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

राज्य सरकार, स्वयं-सहायता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी, ग्रामीण विकास संस्थेशी संलग्न असलेल्या स्वयंसहाय्यता गटांना बसस्थानक, सरकारी कार्यालये, महाविद्यालये आणि इतर ठिकाणी कॅन्टीनचे वाटप करेल.

Goa Home Stay Policy
Goa Tourism: गोव्याच्या पर्यटनात मंदिरे दाखवा, कमी कपड्यातील महिला असलेले बीच नको; हिंदू जनजागृती समितीची मागणी

मुख्यमंत्री म्हणाले, “राज्याच्या पर्यटन विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या होम स्टे धोरणांतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्वयंसहायता गटांना 2 लाख रुपये एकरकमी अनुदान दिले जाईल.

एसएचजी त्यांच्या स्वत:च्या खोल्या वापरू शकतात किंवा भाड्याने घेऊ शकतात आणि होम स्टे धोरणाचा भाग म्हणून पर्यटकांना देऊ शकतात.

स्वयंपूर्ण ई-बाजार उपक्रमांतर्गत बचतगटांना पॅकिंग, विपणन, ब्रँडिंग आणि परवाना यासह सर्व आवश्यक मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com