Goa Tourism: गूगलवर 2023 मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप 10 पर्यटन स्थळांमध्ये गोवा 'या' नंबरवर

सर्वाधिक पसंती कोणत्या डेस्टिनेशनला मिळाली? जाणून घ्या...
Goa at 2nd number in top 10 Tourist destination serached on Google in 2023:
Goa at 2nd number in top 10 Tourist destination serached on Google in 2023: Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa at 2nd number in top 10 Tourist destination serached on Google in 2023: वर्षाची अखेर जवळ येईल तसतसे देशात, जगभरात या वर्षात काय घडले याचा मागोवा घेतला जाऊ लागतो. जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गूगलवरदेखील सर्वाधिक काय सर्च केले गेले, याची माहितीही डिसेंबरच्या अखेरच्या दिवसांमध्ये समोर येत असते.

आताही गूगलवर या वर्षात सर्च करण्यात टॉप 10 टुरिस्ट डेस्टिनेशन कोणती आहेत, याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या टॉप टेनमध्ये भारतातील गोवा हे ठिकाण चक्क दुसऱ्या स्थानी आहे.

गोवा ही देशाची पर्यटन राजधानी मानली जाते. गोव्याकडे देशविदेशातून पर्यटकांचा मोठा ओघ येत असतो. आताही ऑक्टोबरपासून गोव्यातील पर्यटन हंगामाला सुरवात झाल्यानंतर आता डिसेंबरपमध्ये गोव्यातील पर्यटन शिखरावर असते.

कारण ख्रिसमस आणि नववर्षाचे सेलिब्रेशन गोव्यात करायला अनेक पर्यटक प्राधान्य देत असतात.

दरम्यान, गोव्यातील सरकार आणि पर्यटन व्यवसायात असलेल्यांकडुनही पर्यटन हंगाम एनकॅश करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात असतात. या सगळ्याचा परिपाक म्हणूनच गूगल सर्चमध्ये गोवा आघाडीवर असावा, असे म्हणता येऊ शकते.

Goa at 2nd number in top 10 Tourist destination serached on Google in 2023:
Vishwajit Rane: गोवा बनलीय देशाची अपघातांची राजधानी; मंत्री विश्वजीत राणेंनीच व्यक्त केली खंत

अशी आहेत टॉप टेन डेस्टिनेशन्स

1. व्हिएतनाम

2023 या वर्षात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या डेस्टिनेशनमध्ये लोकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे व्हिएतनाम देशाला. सौंदर्याने नटलेल्या व्हिएतनाममध्ये अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. येथील फूडही लोकांच्या पसंतीत पडले आहे.

2. गोवा

या यादीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोवा हनिमूनसाठी फेव्हरेट मानले जाते. तसेच सुट्टी घालवण्यासाठी लोकांची पहिली पसंती गोव्याला असते. इथले समुद्रकिनारे आणि संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते.

3. बाली

देवभूमी मानल्या जाणाऱ्या बालीला गेल्या काही वर्षात पर्यटकांची चांगलीच पसंती मिळत आहे. इथे नैसर्गिक सौंदर्याचा खजाना आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांचे बाली हे फेव्हरेट डेस्टिनेशन आहे.

4. श्रीलंका

या यादीत श्रीलंका चौथ्या स्थानी आहे. निसर्गाने नटलेल्या या देशाला पुरातन संस्कृतीचा वारसा आहे. इथला निसर्ग आणि स्वच्छ-सुंदर समुद्रकिनारे पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक श्रीलंकेत येतात.

5. थायलंड

थायलंडला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. इथली जंगलं, समुद्रकिनारे आणि शॉपिंगचे पर्यटकांना आकर्षण आहे. थायलंडमधली फुकेट, कोह पी, करावी ही ठिकाणे जगप्रसिद्ध आहेत.

Goa at 2nd number in top 10 Tourist destination serached on Google in 2023:
Bhajan Lal Sharma बनले राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री; भाजपचा वसुंधराराजेंना धक्का

6. काश्मिर

जमिनीवरचा स्वर्ग मानले जाणारे काश्मिर येथील बर्फाने वेढलेल्या सौंदर्याने पर्यटकांना भूरळ पाडते. काश्मिरला यावर्षी सहाव्या क्रमांकाची पसंती मिळालीय.

7. कुर्ग

कर्नाटकमधील कूर्ग हे सूंदर हिलस्टेशन पैकी एक आहे. इथले सुंदर धबधबे, किल्ले, संग्रहालये आणि निसर्गाने भरभरून दिलेले सौंदर्य पाहण्यासारखे आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कूर्गला भेट देतात.

8. अंदमान आणि निकोबार

अॅडव्हेंचरची पसंती असलेल्या पर्यटकांची पहिली पसंती असते ती अंदमान-निकोबार बेटाला. इथल्या नैसर्गिक सौंदर्यात भटकंती करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.

9. इटली

गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या पर्यटन स्थळात इटली नवव्या क्रमांकावर आहे.

10. स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड हे नेहमीच प्रत्येकाचे ड्रीम डेस्टिनेशन असते. इथले नैसर्गिक सौंदर्य, सर्वत्र पसरलेली बर्फाची चादर आणि दऱ्या-डोंगर पर्यटकांना आकर्षिक करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com