Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

Goa Snatching Case: सोन्याचे दागिने हिसकावल्याप्रकरणी आरोपी अशोक घारात याला मडगावच्या न्यायालयाने तीन महिन्यांची कैदेची शिक्षा ठोठावली.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सोन्याचे दागिने हिसकावल्याप्रकरणी आरोपी अशोक घारात याला मडगावच्या न्यायालयाने तीन महिन्यांची कैदेची शिक्षा ठोठावली.

या आरोपीला कोकण रेल्वे पोलिसांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी अटक करून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३०३ ( २ ) व ३०४ कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता.

मडगावच्या प्रथम न्यायदंडाधिकारी वैशाली लोटलीकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील एस. नाईक यांनी न्यायालयात काम पाहिले.आरोपीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. त्यानंतर आरोपीला किती शिक्षा देण्यात यावी यावर न्यायालयात सुनावणी झाली.

Crime News
Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. लोटलीकर यांच्या न्यायालयाने आरोपीला ३ महिने १२ दिवसांची साधी कैद व ५०० रु. दंडाची शिक्षा ठोठावली. दोन्ही शिक्षा एकावेळी भोगायच्या आहेत. दंड न भरल्यास आणखी तीन दिवसांची अतिरिक्त साधी कैद भोगावी लागणार आहे.

Crime News
Goa Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! वाळपईत महिलेचं अपहरण करुन नराधमानं केलं निंदनीय कृत्य

चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

या प्रकरणातील मुद्देमालासंबंधी न्यायालयाने पोलिस अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली. तसेच फोनवरून संदेश पाठवण्यात आला होता. तरीही हा अधिकारी १२ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहिला नाही. मुद्देमालावरून संशयितावरील आरोप निश्चित करता येत नव्हते. परिणामी या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्याला वॉरंट काढून न्यायालयात आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com