Goa ZP Election 2025: फोंडा तालुक्यातील कौल कोणाच्या बाजूने? भाजपची प्रतिष्ठा पणाला; विधानसभेची रंगीत तालीम

Ponda ZP Elelction: उसगाव-गांजे, कुर्टी, बोरी, शिरोडा, कवळे, प्रियोळ-वेलिंग व बेतकी-खांडोळा या फोंड्यातील सात मतदारसंघांतील चित्र आज स्पष्ट होणार आहे.
ZP Election 2025
ZP Election 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: आज होणाऱ्या ‘झेडपी’ निवडणुकीत फोंड्यातील सात मतदारसंघ कोणाच्या बाजूने आहेत, याचे उत्तर जनता देणार आहे.

उसगाव-गांजे, कुर्टी, बोरी, शिरोडा, कवळे, प्रियोळ-वेलिंग व बेतकी-खांडोळा या फोंड्यातील सात मतदारसंघांतील चित्र आज स्पष्ट होणार आहे. यंदाच्या या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे फोंड्यातील सातापैकी चार मतदारसंघ महिलांकरिता आरक्षित असून एक इतर मागासवर्गीयांकरिता तर एक अनुसूचित जातींकरिता आरक्षित आहे. त्यामुळे फोंडा तालुक्यात महिला ‘झेडपीं’चे अधिराज्य असणार हे निश्चित आहे.

या तालुक्यातून ‘आरजी’ने सर्वात जास्त सहा उमेदवार रिंगणात उतरवले असून त्यांच्यापाठोपाठ भाजपच्या पाच उमेदवारांचा नंबर लागतो.

आम आदमी पक्षाचे चार उमेदवार स्पर्धेत असून काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीनेही चार उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मगो पक्ष भाजपबरोबरच्या युतीचा घटक असल्यामुळे त्यांच्या वाट्याला फक्त दोनच जागा आल्या आहेत. कवळेत मात्र ‘आरजी’ने ‘मगो’समोर थेट आव्हान उभे केले आहे.

उसगाव-गांजे हा ‘झेडपी’ मतदारसंघ जरी फोंडा तालुक्यात येत असला तरी विधानसभा निवडणुकीकरिता त्याचा समावेश वाळपई मतदारसंघात करण्यात आला आहे.

यामुळे या मतदारसंघाचे आमदार तथा आरोग्य मंत्री यांनी या निवडणुकीत जास्तीत जास्त आघाडी मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या मनीषा उजगावकर आपल्या परीने विश्वजीतांच्या झंझा वाताला तोंड देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असल्या तरी त्याना किती यश मिळते याचे उत्तरही जनता आज देणार आहे. तीच गोष्ट कवळेची.

ZP Election 2025
Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! 300 हून अधिक पोलिस तैनात; मतदारसंघांमध्ये चुरस

राजकीय बंडखोरी की गुप्त पाठिंबा?

बेतकी-खांडोळा जिल्हा पंचायत मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुनील जल्मी आणि भाजप-मगो युतीचे उमदेवार श्रमेश भोसले यांच्यातच दुरंगी लढत होणार आहे. जाणकारांच्या मते, या मतदारसंघात इतर पक्षांचा प्रभाव अल्पच आहे; कारण यापूर्वीही या मतदारसंघात मगो, भाजपचाच विजय झालेला आहे.

बेतकी-खांडोळ्यात महिला मतदारांची संख्या ९,४८७ असून अपक्ष उमेदवार सुनील जल्मी यांच्या घरोघरी प्रचारात महिला वर्गाचा सहभाग मोठा आहे. महिला मतदारांच्या भूमिकेवर येथील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. पुरूष मतदार ८,९७४ आहे. एकूण मतदार १८,४६१ असून या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. मतदानासाठी २६ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. ‘आरजी’चे विनय गावडे, ‘आप’चे शौनक कामत हे अन्य उमेदवार आहेत. या मतदारसंघात एकूण ३७ पंचसदस्य असून ५ सरपंच आहेत. यापैकी बरेचजण जल्मी यांच्या प्रचारात सक्रिय दिसले.

ZP Election 2025
Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

विकास आणि परिवर्तन

भाजप आमदार व माजीमंत्री गोविंद गावडे हे उमेदवार श्रमेश भोसले यांच्या प्रचारात सक्रिय होते. घरोघरी प्रचारादरम्यान त्यांनी विकासासाठी पुन्हा मतदान करण्याचे आवाहन केले. तर अपक्ष उमेदवार सुनील जल्मी व त्यांच्या समर्थकांनी विकासासाठी परिवर्तनाची गरज आहे. बदल झाल्याशिवाय विकास होणार नाही, तेव्हा मतदारांनी आपल्या मतांद्वारे परिवर्तन करावे, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com