

पणजी: सत्ताधारी पक्ष सर्व ५० जिल्हा परिषद जागांवर निवडणूक लढवणार आहेत, ज्यात ४० भाजप, ३ मगो आणि ७ अपक्ष उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवारांना दोन्ही पक्षांच्या युतीने पाठिंबा दिला आहे, अशी माहिती दामू नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सर्व उमेदवारांच्या छायाचित्रांच्या पत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी 'मगो'चे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर व इतरांची उपस्थिती होती. दरम्यान, केतन भाटीकर यांनी घेतलल्या भूमिकेवर ढवळीकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
ढवळीकर म्हणाले की, "दिवंगत रवी नाईक यांच्या निधनानंतर भाटीकर यांनी फोंड्यात पोटनिवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला होता. मात्र, पोटनिवडणुकीसाठी 'मगो' पक्ष दिवंगत रवी नाईक यांच्या मुलालाच उमेदवार म्हणून पाठिंबा देईल", असे पक्षाने त्यांना स्पष्टपणे कळवले होते.
भाटीकर यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय वैयक्तिक आहे आणि त्यांचा राजीनामा केंद्रीय समितीच्या बैठकीत स्वीकारला जाईल.
'गोव्यात भाजपला फक्त आम आदमीचाच पर्याय'
गोव्याची जनता भाजपला विटली असून पर्याय पाहिजे आणि हा पर्याय फक्त आम आदमी पार्टीच देऊ शकते. २०२७ मध्ये आम आदमी पार्टीला गोव्यात स्वतःचे सरकार बनवायचे आहे आणि त्यासाठी आताची जिल्हा पंचायत निवडणूक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केले.
केजरीवाल यांनी शुक्रवारी (१२ डिसेंबर) वेळ्ळी येथे वेळ्ळीच्या जिल्हा पंचायत उमेदवार इसाका फर्नांडिस तसेच गिरदोलीचे उमेदवार जोजफ पिशोट तसेच बाणावलीचे उमेदवार जोजफ पिमेन्ता यांच्या सभांमध्ये भाग घेऊन लोकांना मार्गदर्शन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.