Goa ZP Election 2022: रेईश-मागूश मतदारसंघात 'भाजपचा' एकतर्फी विजय

Goa ZP Election 2022: रेईश-मागूस जिल्हा पंचायत मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय झाला आहे.
Goa ZP Election 2022
Goa ZP Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa ZP Election 2022: रेईश-मागूस जिल्हा पंचायत मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय झाला. या पक्षाचे उमेदवार संदीप बांदोडकर यांनी 4244 मताधिक्क्य मिळविले. दुसऱ्या स्थानावर रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्ष राहिला. विशेष म्‍हणजे राज्यात काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष असूनही या पक्षाच्या उमेदवारास केवळ 509 मते पडली.

भाजपचे उमेदवार संदीप बांदोडकर यांना एकूण 5345 तर ‘आरजी’चे साईनाथ कोरगावकर यांना 1101 मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजेश दाभोळकर यांनी 1091 मते प्राप्‍त केली. शेवटच्‍या स्‍थानावर राहिलेल्‍या काँग्रेसच्या प्रगती पेडणेकर यांना 509 मते पडली. 8114 मतांपैकी 8046 मते वैध ठरली. 68 मते बाद झाली.

Goa ZP Election 2022
Goa Accident Cases: पत्रादेवी-धारगळ महामार्ग मृत्‍यूचा सापळा!

दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले ‘आरजी’चे उमेदवार साईनाथ कोरगावकर यांनी सांगितले की, विश्वास ठेवून मला मतदान केलेल्यांचा मी आभारी आहे. आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अपेक्षित वेळ मिळाला नाही. त्यामुळे मते कमी पडली. शिवाय मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. पैशांशिवाय सामान्य व्यक्तीने इतकी मते मिळविणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

भाजप आमदार केदार नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या रेईश-मागूस झेडपी पोटनिवडणुकीत पक्षाने निर्विवाद वर्चस्व स्‍थापन केले आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांअभावी शक्तीहिन झाल्याने काँग्रेस पक्षाच्‍या उमेदवाराला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. तब्‍बल चौथ्‍या क्रमांकावर पक्षाला समाधान मानावे लागले. मात्र ‘आरजी’च्‍या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी त्‍याने दुसरे स्थान प्राप्त करून लक्षवेधी कामगिरी साधली आहे.

Goa ZP Election 2022
Goa News: स्थलांतर झाले, मात्र दुकानात बसतोय कोण?

काँग्रेसकडून सहकार्य नाही: पेडणेकर

मी एकटीनेच पोटनिवडणुकीत प्रचार केला. पक्षाकडून मला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. काँग्रेसचे अधिकतर कार्यकर्ते हे सत्ताधाऱ्यांसोबत विभागले गेले आहेत. पक्षाची साळगावात संघटनाच उरलेली नाही. फक्त दोन-तीन नेते सोडल्यास कुणीच माझ्यासोबत नव्हते. मला पक्षाची मतेही पडली नाहीत.

केदार नाईक, साळगावचे आमदार-

रेईश-मागूस जिल्‍हा पंचायत मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कौल मतदारांनी भाजपच्या बाजूने दिला असून त्यांनी माझ्या पक्षांतराच्या निर्णयाचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. या निकालामुळे विरोधकांची तोंडे आता बंद झाली आहेत. मतदारसंघाच्‍या विकासासाठी कटिबद्ध आहे.

संदीप बांदोडकर, भाजपचे उमेदवार-

माझ्या विजयासाठी स्थानिक आमदार, सरपंच व पंचसदस्यांनी मेहनत घेतली. त्यांचा तसेच भाजपचा मी ऋणी आहे. जे आमच्यावर टीका करीत होते, त्यांचा आवाज आता बंद झाला आहे. विरोधकांनी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र मतदारांनी लोककौल आमच्या बाजूने दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com