Goa Accident Cases: पत्रादेवी-धारगळ महामार्ग मृत्‍यूचा सापळा!

Goa Accident Cases: राष्‍ट्रीय महामार्ग 66चे रुंदीकरण पत्रादेवी ते धारगळ दरम्‍यान सुरु आहे.
Goa Accident case
Goa Accident caseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Cases: राष्‍ट्रीय महामार्ग 66चे रुंदीकरण पत्रादेवी ते धारगळ दरम्‍यान सुरू आहे. आतापर्यंत या रस्त्यावर 18हून अधिक लोकांचे मृत्‍यू झाले आहेत. त्यात तोर्से सरकारी हायस्कूलकडे आठ जण मृत्युमुखी पडले आहेत. या भागातील रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत अजूनही ज्या पद्धतीने रस्त्याचे रुंदीकरण आणि अर्धवट स्थितीत रस्ता आहे त्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक सरपंच प्रार्थना मोटे यांनी सांगितले

या रस्त्यावरून दररोज हजारो अवजड लहान-मोठी वाहने ये जा करत असतात आणि याच रस्त्याच्या बाजूला सरकारी विद्यालये असल्याने दिवसाकाठी सकाळ संध्याकाळ शेकडो विद्यार्थी या धोकादायक स्थितीच्या रस्त्यावरून ये जा करत असतात.

Goa Accident case
Goa News: स्थलांतर झाले, मात्र दुकानात बसतोय कोण?

रस्त्याच्या बाजूला कसल्याच प्रकारची संरक्षण भिंत नसल्यामुळे अपघाताला जास्त संधी मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी जंक्शन आहे. व्यवस्थित दिशाफलक नसल्याने अर्धवट स्थितीत असलेल्या या रस्त्याकडे पोचल्यानंतर नेमका हा रस्ता कुठे जातो याचा पत्ता न लागल्याने वाहनधारकांत संभ्रम निर्माण होत आहे.

यावरही आजपर्यंत कसल्याच प्रकारची उपाययोजना केली गेली नसल्याने मागच्या महिन्यात या ठिकाणी मोठा अपघात होऊन एका तान्हुल्यासहित आपल्या आईला जीव गमवावा लागला होता. पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ महाजनपर्यंतच्या रस्त्याचे 800 पेक्षा जास्त कोटी रुपये खर्च करून एम व्ही आर कंत्राटदार या रस्त्याचं रुंदीकरण काम करत आहे.

रस्त्यासाठी अतिरिक्त जागा आवश्यक आहे, कोणत्या ठिकाणी धोकादायक वळणे आहेत, ती वळणे कशा पद्धतीने कमी करता येतील, यावरही आजपर्यंत स्थानिक पंचायतींना विश्वासात न घेता या कंत्राटदाराने काम हाती घेतलेले आहे.

Goa Accident case
Amit Patkar: बेकायदेशीर जमीन रुपांतरातून दिसतयं 'मायकल लोबोंचे' काम

परिणामी ज्या पद्धतीने या रस्त्याचे हॉटमिक्स आणि काँक्रिटीकरणाचे काम उंच खाली झिकझॅक पद्धतीने झालेले आहे, त्यामुळे देशातील सर्वात खराब राष्ट्रीय महामार्ग कोणता असेल तर तो आपल्या पेडणे तालुक्यातून जात असलेला रस्ता आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षित असावा अशी नागरिकांची अपेक्षाच होती, परंतु तशा प्रकारचा रस्ता कंत्राटदाराने केला नाही आणि हलगर्जीपणामुळे अनेक बळी गेल्याची प्रतिक्रिया सूर्यकांत तोरस्कर यांनी दिली.

आतापर्यंत 18 मनुष्यबळी

राष्ट्रीय महामार्ग धारगळ महाखाजन ते पत्रादेवी पर्यंतच्या रस्त्याचे ज्या दिवसापासून रुंदीकरण कामाची सुरुवात केली, त्या दिवसापासून या रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडून आतापर्यंत 18 मनुष्यबळी गेलेले आहेत आणि त्याला पूर्ण जबाबदार कंपनी कंत्राटदार आहे.

या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी यासाठी पेडणे तालुक्यातील नागरिकांनी पोलिस तक्रारीशिवाय सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तसेच पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनाही यापूर्वीच निवेदन सादर केले होते. परंतु आजपर्यंत कसल्याच प्रकारची कारवाई करण्याची हिम्मत सरकारने दाखवलेली नाही.

Goa Accident case
Goa Mining: गोव्यातील खाण क्षेत्रांवर आता ड्रोनची करडी नजर

आमचीच चूक झाली

याविषयी तोरसेच्या सरपंच प्रार्थना मोटे यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना सांगितले की, हा रस्ता आणि जास्त करून तोरसे सरकारी हायस्कूल परिसरातील रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. तो अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

या रस्त्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांनी आवाज उठवला होता.. परंतु सरकारने काही प्रमाणात आमची समजूत काढली आणि आम्ही रस्ता करण्यास हिरवा कंदील दाखवला हीच आमची मोठी चूक झाली. सरकारला अजूनही एम व्ही आर विरुद्ध जुमला गेला नाही. त्यामुळे आजही तो मनमानी पद्धतीने काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com