Goa News : महिला पोलिस स्थानकाला हवा पूर्णवेळ निरीक्षक

सध्या उपनिरीक्षकाकडे ताबा : प्रलंबित तक्रारींच्या चौकशीवर होतोय परिणाम
  Police Station
Police Station Gomantak Digital Team
Published on
Updated on

Goa News : पणजी महिला पोलिस स्थानकातील निरीक्षकाविरुद्ध खात्यांतर्गत कारवाई करत बदली केल्याने त्याचा अतिरिक्त ताबा पोलिस नियंत्रण कक्षाच्या महिला निरीक्षकांकडे देण्यात आला आहे. हा अतिरिक्त ताबा असल्याने या निरीक्षक पूर्णवेळ ताबा असलेल्या ठिकाणी बसतात.

त्यामुळे महिला पोलिस स्थानकात अनेक महिलांचे अर्ज चौकशीस पडून असल्याने त्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या महिला पोलिस स्थानकात पूर्णवेळ निरीक्षक नसल्याने तक्रारी देण्यास येणाऱ्या महिलांना अनेकदा रिकाम्या हाती परतण्याची वेळ येत आहे. सध्या या स्थानकाची जबाबदारी महिला उपनिरीक्षकांवर येऊन ठेपली आहे.

  Police Station
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील सिंगल लेनचे काम गणपतीपुर्वी पूर्ण करा; नितीन गडकरींचे आदेश

महिला पोलिस स्थानकात विविध प्रकारच्या तक्रारी येत असतात. या तक्रारीवरील चौकशीसाठी दोन्ही पक्षांना बोलावून त्यातून समझोता करणे शक्य आहे का, यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न केले जातात. त्यातून तोडगा निघत नसल्यास गुन्हाही दाखल केला जातो. अशा अनेक तक्रारी चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

  Police Station
Sanquelim Municipal Elections: पुढील 25 वर्षे साखळी पालिका भाजपचीच

या स्थानकातील पोलिस निरीक्षकांचीच उचलबांगडी झाल्याने त्या जागी पूर्णवेळ निरीक्षकाची वर्णी लावण्याऐवजी अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. त्यामुळे तक्रारींवर वेळीच निर्णय होत नसल्याचा परिणाम होत आहे.

पणजी महिला पोलिस स्थानकात आधीच पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. बहुतेक कर्मचारी महिलाच असल्याने तपासकामासाठी गोव्याबाहेर जायचे झाल्यास पुरुष पोलिसांची मदत घेण्यासाठी गोवा पोलिस दलातून कर्मचारी मागवावे लागतात.

  Police Station
Ponda News : जनसुनावणीआधीच केले सर्वेक्षण

तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता

सध्या बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांनी अनेक तक्रारी काही वेळात हातावेगळ्या केल्या होत्या. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे या पोलिस स्थानकातील तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यातील कोणतीही पीडित महिला या पोलिस स्थानकात तक्रार दाखल करू शकते. त्यामुळे या स्थानकाचे अधिकार क्षेत्र मोठे आहे.

  Police Station
Ponda Municipal Election: भाटीकरांचे नेतृत्व निर्णायक ठरणार?

महिला पोलिस निरीक्षकांची बदली काही क्षुल्लक कारणावरून झाली आहे. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत असूनही कोणी अधिकारी पोलिस महासंचालकांकडे मुद्दा मांडण्यास पुढे जात नसल्याने अशा निरीक्षकांचे खच्चीकरण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com