Sanquelim Municipal Elections
Sanquelim Municipal ElectionsDainik Gomantak

Sanquelim Municipal Elections: पुढील 25 वर्षे साखळी पालिका भाजपचीच

श्रीपाद नाईक : नवनिर्वाचित नगरसेवकांचे केले अभिनंदन; मतदारसंघ बनलाय भाजपमय
Published on

Sanquelim Municipal Elections साखळी नगरपालिकेवर मिळविलेल्या निर्विवाद वर्चस्वामुळे संपूर्ण मतदारसंघ आता भाजपमय झालेला आहे. त्यामुळे पुढील किमान 25 वर्षे तरी पालिकेवर भाजपचीच सत्ता राहिल असे म्‍हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

साखळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या धडाडीचे कौतुक हे व्हायलाच हवे. राजकारण हे समाजसेवसाठी असते आणि ते तसे केल्यानेच भाजप आज देशात उच्च पातळीवर पोहोचला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

Sanquelim Municipal Elections
CM Pramod Sawant : समृद्ध गोमंतकीय संस्कृतीचे विदेशींना दर्शन; महत्त्वाची बाब !

भाजप समर्थक पॅनलच्‍या साखळीतील सर्व विजयी नगरसेवकांचे श्रीपाद नाईक यांनी अभिनंदन केले. त्‍यानंतर ते बोलत होते. साखळी भाजप कार्यालयात झालेल्‍या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर गोवा अध्यक्ष उल्हास अस्नोडकर, साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सरचिटणीस संजय नाईक, नगरसेवक यशवंत माडकर, निकिता नाईक, सिद्धी प्रभू, रश्मी देसाई, विनंती पार्सेकर, ब्रह्मानंद देसाई, रियाझ खान, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, दीपा जल्‍मी व अंजना कामत यांची उपस्थिती होती. प्रारंभी संजय नाईक यांनी स्‍वागत केले तर त्‍यांनीच शेवटी आभार मानले.

Sanquelim Municipal Elections
Ponda Municipal Election: भाटीकरांचे नेतृत्व निर्णायक ठरणार?

आज विजयी रॅली व स्नेहमेळावा

साखळी नगरपालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्याने भाजपतर्फे उद्या बुध. दि. 10 मे रोजी साखळी शहरात विजयी रॅली व रात्री रवींद्र भवनात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 4 वाजता गावठण येथील श्री सातेरी केळबाई मंदिराकडून रॅलीला प्रारंभ होणार आहे.

या रॅलीला व नंतर होणाऱ्या स्नेहमेळाव्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत, असे साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी सांगितले.

सदर रॅली गावठण येथून वसंतनगर, हरवळे हाऊसिंग बोर्ड, देसाईनगर, मुजावरवाडा, बाजार, विर्डी येथे जाऊन म्हावळंगतडमार्गे रवींद्र भवनात दाखल होणार आहे.

तेथील खुल्‍या जागेत सर्व कार्यकर्त्यांसाठी स्नेहमेळावा होईल. या स्नेहमेळाव्यात सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मुख्यमंत्री अभिनंदन करून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com