Ponda News : जनसुनावणीआधीच केले सर्वेक्षण

मुर्डीवासीय संतापले : जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांचे काम रोखले
Abhijit Gavade
Abhijit GavadeGomantak Digital Team
Published on
Updated on

फोंडा : जनसुनावणीपूर्वी सहा दिवस आधीच खांडेपार-मुर्डी येथील बंधाऱ्यासाठी सर्वेक्षण करण्यास जलस्रोत खात्याचे अधिकारी आल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त करत सर्वेक्षण बंद केले. स्थानिक पंच अभिजीत गावडे यांनी सांगितले की, जलस्रोत खात्याने १५ मे रोजी जनसुनावणी घेणार, अशा स्वरूपाचे पत्र खांडेपार पंचायतीला पाठविले आहे.

तरीही आज, मंगळवारी सकाळी जलस्रोत खात्याचे अधिकारी पोलिसांसह सर्वेक्षण करण्यासाठी मुर्डी या ठिकाणी आले व सर्वेक्षण सुरू केले. याची चाहुल स्थानिकांना लागली, तेव्हा स्थानिकांनी बंधाऱ्याच्या ठिकाणी धाव घेऊन सर्वेक्षणाचे काम थांबविले. जोपर्यंत जनसुनावणी घेऊन बंधाऱ्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काम करू देणार नसल्याचा इशारा स्थानिक पंच अभिजीत गावडे यांनी दिला.

Abhijit Gavade
Bay of Bengal Cyclone Mocha: राज्यात ‘मोचा’चा प्रभाव, वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

स्थानिकांना विश्‍वासात घ्या!

नीलेश नाईक म्हणाले की, हे क्षेत्र सीआरझेडखाली येत असून डीपीआरमध्ये थेट सांगितले आहे की, स्थानिकांना आधी विश्वासात घ्या, त्यांच्यासोबत बैठका घ्या; पण त्यांनी स्थानिकांना अजूनपर्यंत विश्वासात घेतलेलेच नाही, तसे याठिकाणी बैठकाही झालेल्या नाहीत. हा प्रकल्प बेकायदेशीर असून तो सरकार लोकांच्या माथी मारत आहे. सरकार स्थानिकांची फसवणूक करीत आहे. जनसुनावणीच्या आधी सर्वेक्षण का केले, असा प्रश्‍न गावडे यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com