Goa Women Scheme: रोजगार संधीसाठी नवी योजना! महिलांच्या श्रमाला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड; प्रशिक्षणाचा खर्च सरकार करणार

Goa Women Digital Empowerment Scheme: १८ वर्षे पूर्ण केलेल्या आणि किमान १५ वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
Goa Women Digital Empowerment Scheme
Goa Women SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करता यावा, त्यांच्या कौशल्यात वाढ व्हावी आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्य सरकारने ‘महिला डिजिटल सशक्तीकरण योजना’ सुधारित स्वरूपात अधिसूचित केली आहे.

माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभागामार्फत राबविण्यात येणारी ही योजना आजपासून लागू झाली असून राज्यभरातील महिलांना संगणकीय आणि डिजिटल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना डिजिटल ज्ञानाअभावी शिक्षण, रोजगार आणि आर्थिक संधींपासून वंचित राहावे लागते. ही उणीव भरून काढण्यासाठी

Goa Women Digital Empowerment Scheme
Goa Education: 3 वर्षांपासून निधीअभावी अडचणीत असलेल्या 'बाल हक्क आयोगा'ला अखेर सरकारी अनुदान; 'गोमन्तक'च्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

...या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

१८ वर्षे पूर्ण केलेल्या आणि किमान १५ वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. १५ वर्षांच्या वास्तव्यासंदर्भातील प्रमाणपत्र नसल्यास मतदार ओळखपत्र पर्यायी पुरावा म्हणून स्वीकारले जाईल.

लाभार्थ्यांनी असा करावा अर्ज

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन सादर करावा. विहित नमुन्यातील अर्ज, छायाचित्र, शैक्षणिक पात्रतेचा दाखला जोडावा. १५ वर्षांचे वास्तव्य प्रमाणपत्र, पर्यायी कागदपत्रे तसेच आधारकार्ड आवश्यक.

Goa Women Digital Empowerment Scheme
Goa State Women Commission: राज्य महिला आयोगाचा कारभार 87 दिवसांपासून ठप्प! माजी अध्यक्षा रंजिता पै यांच्यानंतर नव्या नियुक्तीला सावंत सरकारला मुहूर्त मिळेना

योजनेची वैशिष्ट्ये

शासनातर्फे प्रतिलाभार्थी ५०० रुपये प्रशिक्षण खर्च.पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त १०० रुपयांची मदत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com