Goa Monsoon: गोव्यात पुढील 5 दिवस ‘यलो अलर्ट’! ओलांडला 47 इंचांचा टप्पा, धारबांदोड्यात सर्वाधिक

Goa Rain: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिक होता, परंतु कालपासून राज्यात पावसाचा जोर मंदावला असून मध्यम स्वरूपाचा पाऊसाची बरसात होत आहे.
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिक होता, परंतु कालपासून राज्यात पावसाचा जोर मंदावला असून मध्यम स्वरूपाचा पाऊसाची बरसात होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी २३.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून राज्यात आत्तापर्यंत ४७ इंच पाऊस पडला असून जर चांगला पाऊस पडल्यास येत्या काही दिवसांत पावसाचे अर्धशतक होण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आली आहे. यंदा मॉन्सून २२ मे रोजी राज्यात दाखल झाल्यापासून मध्ये काही काळ पाऊस मंदावला होता, परंतु काही दिवसांपासून आता राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम आहे.

तरी देखील सरासरी पावसाच्या तुलनेत राज्यात ३ टक्के कमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी ८ जुलैपर्यंत राज्यात पावसाने ५० इंचाचा टप्पा गाठला होता, परंतु यंदा अजून काही दिवस जावे लागतील.

दरम्यान, पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस जोरात कोसळला होता. त्यामुळे यंदा लवकर पाऊस सुरू झाल्याने पाऊस अधिक होण्याची शक्यता वर्तविली जात होती, पण त्यानंतर पाऊस वेग मंदावला आहे.

Goa Weather Update
Goa Monsoon Treks: मान्सूनमध्ये पश्चिम घाट जिवंत होतो, गोवा हिरव्यागार सौंदर्याने नटतो; अनोळखी वाटा साद देऊ लागतात..

धारबांदोड्यात तब्बल ७१ इंच

राज्यात धारबांदोडा, सांगे, काणकोण, केपे, वाळपई आदी भागात जोरदार पाऊस पडला आहे, तर मुरगाव, मडगाव ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडला आहे.

धारबांदोडा येथे आत्तापर्यंत तब्बल ७१ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर मुरगाव येथे सर्वात कमी ३०.१५ इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Goa Weather Update
Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

आतापर्यंतचा पाऊस

राज्यातील पाऊस ४७ इंच

उत्तर गोवा ४६.२९ इंच

दक्षिण गोवा ४७.६३ इंच

धारबांदोडा (सर्वाधिक) ७१.४७ इंच

मुरगाव (सर्वात कमी) ३०.१५ इंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com