

पणजी: राज्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. तापमानाचा पारा सातत्याने चढत असल्याने दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असून आकाश ढगाळ झाले आहे. या बदलामुळे काही प्रमाणात उष्णतेत दिलासा मिळत असला तरी उकाडा कायम आहे.
मंगळवारीदेखील दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच बुधवारी आणि गुरुवारी राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती गोवा वेधशाळेने दिली आहे. अचानक होणाऱ्या या हवामान बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासोबत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
या बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, उष्णतेपासून बचाव करणे आणि आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.