Goa Tourism: गोव्यात पर्यटन हंगाम संपला, शॅक्‍स व्यवसाय बंद; सप्टेंबरपासून पुन्‍हा नव्या जोमात होणार सुरूवात

Goa Tourism Season 2025: राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना आकर्षित करणारा, पर्यटन ओळखीचा अविभाज्य भाग असलेला आणि व्‍यावसायिकांना चार पैसे मिळवून देणारा शॅक्‍स व्यवसाय आता यंदाच्या पर्यटन हंगामासाठी बंद झाला आहे.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना आकर्षित करणारा, पर्यटन ओळखीचा अविभाज्य भाग असलेला आणि व्‍यावसायिकांना चार पैसे मिळवून देणारा शॅक्‍स व्यवसाय आता यंदाच्या पर्यटन हंगामासाठी बंद झाला आहे. पर्यटन विभागाने दिलेल्या मुदतीत सर्व शॅक्‍स बंद करण्यात आले आहेत. त्‍यामुळे राज्यातील समुद्रकिनारे शॅक्‍सविरहित दिसत आहेत.

शॅक्‍समालक कल्याण संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या एकही शॅक्‍स सुरू नाही. सर्व ३८० हून अधिक शॅक्‍स बंद करण्‍यात आलेले आहेत. हे काम पर्यटन विभागाच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण झाले आहे.

Goa Tourism
Goa Cabinet Decision: गोमंतक संस्कृतीच्या रक्षणासाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! 'वारसा धोरण 2025'ला दिली मंजुरी

दरवर्षी आम्ही पर्यटन खात्याशी समन्वय साधून वेळेत शॅक्‍स बंद करतो. शॅक्‍स संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आम्ही अधिक शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धती अवलंबत आहोत.

Goa Tourism
Goa Education: इयत्ता नववीच्‍या राज्यशास्त्र, इतिहास पाठ्यपुस्तकात बदल, शिक्षकांना 12 ते 14 जूनदरम्यान मार्गदर्शन

राज्यातील पर्यटन हंगाम हिवाळ्यात सुरू होतो. याच अनुषंगाने शॅक्‍स उभारणीसाठीची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण केली जाणार आहे. सप्टेंबरपासून ते पुन्हा सुरू होतील. पावसाळी हंगामात समुद्र खवळलेला असतो व हवामान बदलते. त्यामुळे शॅक्‍स बंद ठेवावे लागतात. - क्रुझ कार्दोझ, अध्यक्ष (शॅक्‍समालक कल्याण संघटना)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com