Goa Education: इयत्ता नववीच्‍या राज्यशास्त्र, इतिहास पाठ्यपुस्तकात बदल, शिक्षकांना 12 ते 14 जूनदरम्यान मार्गदर्शन

Class 9 textbook changes: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता नववीच्या राज्यशास्त्र आणि इतिहास पाठ्यपुस्तकात बदल केला आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम कशा प्रकारे शिकवावा यासंबंधी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येईल.
Goa Education
Goa EducationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता नववीच्या राज्यशास्त्र आणि इतिहास पाठ्यपुस्तकात बदल केला आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम कशा प्रकारे शिकवावा यासंबंधी १२ ते १४ जून यादरम्यान सकाळी १० ते संध्‍याकाळी ४.३० या वेळेत शिक्षण शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येईल.

१२ रोजी तिसवाडी, बार्देश, पेडणे आणि डिचोलीतील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येईल. १३ रोजी सत्तरी, फोंडा, धारबांदोडा आणि मुरगाव तर १४ रोजी सासष्टी, केपे, काणकोण आणि सांगेच्या शिक्षकांना मार्गदर्शन केले जाईल.

Goa Education
Goa Cabinet Decision: गोमंतक संस्कृतीच्या रक्षणासाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! 'वारसा धोरण 2025'ला दिली मंजुरी

शिक्षकांसाठी कार्यशाळा

इयत्ता अकरावी आणि बारावीच्या इतिहास विषयाच्‍या शिक्षकांना आज बुधवारी शालान्त मंडळाद्वारे कार्यशाळा आयोजित करून विषयाच्या सुसूत्रीकरणासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांच्या इतिहास शिक्षकांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थिती लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Building Rules 2023
Goa Ganesh Immersion Safety 2026
AI Wildlife protection System India
Jaisalmer Fort
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com