Goa Tourism: हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात 2 लाख नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार- मुख्यमंत्री सावंत

Goa Tourism: येत्या पाच वर्षांत पर्यटनाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात दोन लाखांपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Goa Tourism | Pramod Sawant
Goa Tourism | Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: गोव्यात येत्या पाच वर्षांत पर्यटनाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात दोन लाखांपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचे गोमंतकीयांनी सोने करावे, अन्यथा बाहेरील लोक येऊन त्याचा फायदा घेतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दरम्यान, या संधीचे सोने केल्यास गोव्यात कुणीही बेरोजगार राहणार नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. मंगळवारी, साळगावचे आमदार केदार नाईक यांच्या बेती येथील कार्यालयाचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

Goa Tourism | Pramod Sawant
Goa News: सात पर्यटकांना जीवनदान, तीन बेपत्ता मुलांना शोधण्यात जीवरक्षकांना यश

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की पर्यटनाशी निगडित पदवीसोबत, कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वतःला अद्ययावत केले पाहिजे. यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत. सध्या सरकारने औद्योगिक संघटनेच्या 35 संस्थांसोबत करार करीत आयटीआय (ITI) विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण देते. याच धर्तीवर हॉटेल औद्योगिक संस्थांशी करार केला आहे.

जेणेकरून फ्रंट डेस्क व आदरातिथ्य क्षेत्रात तीन ते सहा महिने प्रशिक्षण देऊन तिथेच संबंधितांना कामाची संधी उपलब्ध करून देण्यास सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, बेतीप्रमाणे साळगावमध्येही लवकरच नवीन कार्यालय उघडले जाईल. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांच्यामुळे माझी ताकद आणखी वाढल्याचे आमदार केदार नाईक म्हणाले.

Goa Tourism | Pramod Sawant
Goa Mining Case: खाणप्रकरणी सांगेत तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल

तसेच, या कार्यक्रमावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, साळगाव भाजपा मंडळ अध्यक्ष रमेश घाडी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काही जुन्या तसेच नवीन सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये रिव्होल्युशनरी गोवन्सच्या काही सदस्यांचा समावेश होता.

‘स्थानिकांनी नोकऱ्यांचा लाभ घ्यावा’

सरकारी नोकरीत सर्वांनाच नोकऱ्या मिळू शकत नाहीत. मात्र, कौशल्य विकास शिक्षणाच्या माध्यमातून शंभर टक्के नोकऱ्या देण्याची ताकद सरकार तसेच खासगी उद्योग क्षेत्राकडे असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

Goa Tourism | Pramod Sawant
Mayor Damodar shirodkar: मडगावच्या नगराध्यक्षपदी 'दामोदर शिरोडकर' बिनविरोध

पर्यटन क्षेत्राच्या आदरातिथ्य, आयटी, इलेक्ट्रॉनिक उत्पादन सिटी तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होत होत आहे अमे ते म्हणाले. त्याचा फायदा गोमंतकीय युवकांनी घ्यावा. आसाम तसेच इतर राज्यांतील युवक हे गोव्यात ‘व्हाईट कॉलर जॉब’ करतात. या संधीचा स्थानिकांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

‘कारवाया खपवून घेणार नाही’

पीएफआयच्या काही सदस्यांना अटक झाल्याने काही राजकारण्यांच्या पोटात दुखत आहे. मुळात देशविरोधी कारवाया आम्ही खपवून घेणार नाही. याशिवाय अकारण कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आमचे सरकार (Government) घेते.

Goa Tourism | Pramod Sawant
MIG29 Fighter Jet Crash: गोव्यात लढाऊ विमानाचा तांत्रिक बिघाडामुळे अपघात

गोव्यातील मुस्लिम व ख्रिश्चन हे एकोप्याने इथे नांदतात. मुळात राज्यात जातीभेद किंवा धर्मासाठी कधीही भांडण झालेले नाही आणि यापुढे तसा कुणीही प्रयत्न करू नये. मात्र, स्वतःच्या हितासाठी काही राजकारण्यांना भांडण लावण्यातच रस असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com