MIG29 Fighter Jet Crash| Goa news
MIG29 Fighter Jet Crash| Goa newsDainik Gomantak

MIG29 Fighter Jet Crash: गोव्यात लढाऊ विमानाचा तांत्रिक बिघाडामुळे अपघात

Goa Latest News: गोव्याच्या समुद्रावर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे.
Published on

Goa: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यात नौदलाचे MiG-29 'K' हे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात फायटर जेटचा पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अपघातापूर्वी वैमानिकाने परिस्थिती पाहून विमानातून बाहेर पडून समुद्रात उडी मारली, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.

नौदलाने शोध आणि बचाव मोहिमेद्वारे पायलटची नंतर सुटका केली. सध्या पायलटची प्रकृती स्थिर आहे. मिग-29 'के' लढाऊ विमानाच्या अपघातामागील कारणे शोधण्याचे आदेश चौकशी मंडळाला (BoI) देण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गोव्याच्या (Goa) किनाऱ्यावर नियमित उड्डाण करताना तळावर परतत असताना तांत्रिक बिघाडामुळे मिग-29 के हे लढाऊ विमान समुद्रात कोसळले.

2021 मध्ये मिग-21 हे लढाऊ विमान कोसळले होते

डिसेंबर 2021 मध्ये भारतीय हवाई (Indian Navy) दलाचे मिग-21 लढाऊ विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळले होते. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला. त्यादरम्यान, भारतीय वायुसेनेने ट्विट केले की ही घटना संध्याकाळच्या फ्लाइट दरम्यान घडली ज्यामध्ये विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com