Goa News: सात पर्यटकांना जीवनदान, तीन बेपत्ता मुलांना शोधण्यात जीवरक्षकांना यश

मागील काही दिवसांत कळंगुट-बागा बीच परिसरात या घटना घडल्या आहेत.
Goa News: सात पर्यटकांना जीवनदान, तीन बेपत्ता मुलांना शोधण्यात जीवरक्षकांना यश
Published on
Updated on

Goa News: बीचवरून बेपत्ता झालेल्या तीन लहान मुलांना शोधण्यात तसेच, सात पर्यटकांना समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. मागील काही दिवसांत कळंगुट-बागा बीच (Calangute-Baga Beach) परिसरात या घटना घडल्या आहेत.

Goa News: सात पर्यटकांना जीवनदान, तीन बेपत्ता मुलांना शोधण्यात जीवरक्षकांना यश
Goa CM यांनी दिल्लीत घेतली उपराष्ट्रपतींची भेट, पर्यटनमंत्र्यांची स्वदेशी पर्यटन बैठकीला हजेरी

बेपत्ता होण्याच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पहिली घटना दोन वर्षांच्या मुलीची होती. तसेच, राजस्थान येथील एक पर्यटकाची सहा वर्षीय मुलगी बीचवरून अचानक गायब झाली. तर, तिसऱ्या घटनेत उत्तराखंड येतील दहा वर्षांचा मुलगा देखील बेपत्ता झाला होता. या तिघांना शोधून काढण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. जीवरक्षकांनी बेपत्ता मुलांना शोधून पालकांकडे सूपूर्द केले.

कर्नाटक येथील चार युवक कळंगुट येथे समुद्राच्या पाण्यासह आत ओढले गेले. लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बीचवरील जीवरक्षकांनी या चार युवकांना वाचवले आहे. तसेच, राजस्थान येथील 32 आणि 34 वयाचे दोन व्यक्ती देखील वाहून जात असताना त्यांना जीवरक्षकांना बचावले आहे.

Goa News: सात पर्यटकांना जीवनदान, तीन बेपत्ता मुलांना शोधण्यात जीवरक्षकांना यश
Mayor Damodar shirodkar: मडगावच्या नगराध्यक्षपदी 'दामोदर शिरोडकर' बिनविरोध

बागा बीचवरती बंगळुरू येथील दोन युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना त्यांनी मदत मागितली. दृष्टी जीवरक्षक दलाच्या जवानांनी दोघांना ट्युब आणि जेटस्कीच्या मदतीने बाहेर काढले. तसेच, कर्नाटक येथील एक व्यक्ती देखील बुडत असताना त्यांने मदतीसाठी याचना केली व त्याला वाचवण्यात दलाला यश आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com