मांद्रे माजी सरपंचांवरील हल्ला प्रकरण, सर्व आरोपी कर्नाटकातून अटक; गोव्यातील ठळक बातम्या

6 December 2024 Marathi Breaking News: सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेषप्रदर्शन सोहळा, जत्रौत्सव आणि गोव्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी
Goa Today Live Updates: मांद्रेच्या माजी सरपंचांवरील हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपी अटकेत!
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

मांद्रेच्या माजी सरपंचांवरील हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपी अटकेत!

मांद्रेचे माजी सरपंच महेश कानोडकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी विश्वनाथ हरिजन, सुरेश नाईक, साईराज गोवेकर, फ्रँकी नाडर, मनीष हडफडकर, आणि उद्देश शेट्टी यांना अटक करण्यात आली.

कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची बैठक!

राज्याचे कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी कृती दलाची बैठक घेतली. खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना आरक्षण, स्थानिक कामगारांतील कौशल्य विकासासह खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

जमीन हडप प्रकरणी नोटरीत नावे असलेल्यांवर कारवाई होणार; मंत्री सिक्वेरा

न्यायाधीश जाधव आयोगाच्या अहवालात जमीन हडप प्रकरणात नावे असलेल्यां नोटरींवर कायदेशीर कारवाई होणार. सेवा बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचेही राज्याचे कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

Goa Today Live Updates: मांद्रेच्या माजी सरपंचांवरील हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपी अटकेत!
Goa Politics:...तर काँग्रेस गोव्यातून हद्दपार होईल! आपच्या वेंझी व्हिएगस यांचा इशारा; INDIA आघाडीतील बिघाडीला फुटली वाचा

साखळीसह अनेक भागात अवकाळी पावसानं लावली हजेरी!

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं धूमशान घातलं आहे. साखळी, माशेल, कुडचडेसह इतर भागात पावसानं हजेरी लावली. हवामान विभागाकडून शुक्रवारी (6 डिसेंबर) साठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्रह्मेशानंद स्वामींना बजरंग दल आयोजित शौर्य यात्रेला निमंत्रण!

विश्व हिंदू परिषद-बजरंग दल आयोजित रविवार 8 डिसेंबर रोजी सावर्डे- कुडचडे येथे होणाऱ्या गीता जयंतीनिमित्त शौर्य यात्रेचे ब्रह्मेशानंद स्वामींना निमंत्रण.

चेक बाऊन्स प्रकरणी रोहन हरमलकरला पुन्हा अटक!

चेक बाऊन्स प्रकरणी रोहन हरमलकरविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. पर्वरी पोलिसांनी हरमलकरला अटक करुन न्यायालयात हजर केले. नुकतेच हरमलकर याला एका वादग्रस्त मालमत्तेच्या प्रकरणात अटक करुन जामीन मिळाला होता.

... तर गोव्यातून काँग्रेसचा सफाया होईल; आमदार व्हिएगस स्पष्टच बोलले!

2027 मध्ये गोवा विधानसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. भाजपला शह देण्यासाठी राज्याती विरोधक एकवटणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तत्पूर्वीच, गोवा आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीवर भाष्य केलं. आमच्या दिल्ली दौऱ्यात आम्ही काँग्रेस नेतृत्वाशी आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. आम्ही त्यांना गोवा काँग्रेसचे कामकाज कसे चालते याची माहिती दिली आहे. एकत्र येण्याची हीच वेळ आहे. मात्र काँग्रेसने नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी हात पाय मारण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा गोव्यातून सफाया होईल, असे आमदार व्हिएगस म्हणाले.

143 होमगार्ड पदासाठी भरती प्रक्रिया सुरु: डीजीपी आलोक कुमार यांची माहिती

गोव्यात होमगार्डची एकूण संख्या 1,230 आहे या 945 पैकी पुरुष आणि 285 महिला आहेत. याव्यतिरिक्त, 143 पदांची भरती सुरू आहे. गोवा सरकारने पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी होमगार्डसाठी 10% आरक्षण ठेवले आहे. होमगार्ड जर त्यांच्या सेवेत चांगले काम करत असतील तर त्यांना बक्षिसेही दिली जावीत: डीजीपी आलोक कुमार

मोले पंचायतीच्या सरपंचपदी सुहास गांवकर यांची बिनविरोध निवड

मोले पंचायत सरपंच म्हणून सुहास गांवकर यांची बिनविरोध निवड. सर्व पंचाना विश्वासात घेऊन आमदार डॉ. गणेश गांवकर याच्या मार्गदर्शनखाली गावातील विकास करणार असे नवनिर्वाचित सरपंच सुहास गांवकर यांनी सांगितले.

राज्यात आज यलो अलर्ट, पाऊस घालणार धूमशान!

राज्यात सध्या एकीकडे कडाक्याची थंडी असताना दुसरीकडे अवकाळी पावसानं दस्तक दिली आहे. हवामान विभागाकडून शुक्रवारी (6 डिसेंबर) यलो अलर्ट जारी केला आहे. दोन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Goa Today Live Updates: मांद्रेच्या माजी सरपंचांवरील हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपी अटकेत!
Bicholim Mining Issue: मिटता मिटेना गुंता! सतरा दिवसांपासून 'वेदांता'ची खनिज वाहतूक बंद, शेतकऱ्यांचा विरोध कायम

धारगळ पंचायतीने सनबर्न फेस्टिव्हलला दिलेल्या न हरकत दाखल्यास हायकोर्टात आव्हान!

धारगळ पंचायतीने सनबर्न फेस्टिव्हलला दिलेल्या न हरकत दाखल्यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. येत्या 9 डिसेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार.

लिफ्ट पडली महागात, दुचाकीवरुन पडल्याने महिला जखमी; डिचोलीतील घटना

लिफ्ट पडली महागात. दुचाकीवरुन पडल्याने महिला जखमी. 'स्पीडब्रेकर'वर दुचाकीला धक्का बसताच मागे बसलेली महिला रस्त्यावर पडली. डिचोलीत अपघात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com