Goa Politics:...तर काँग्रेस गोव्यातून हद्दपार होईल! आपच्या वेंझी व्हिएगस यांचा इशारा; INDIA आघाडीतील बिघाडीला फुटली वाचा

Goa INDIA Alliance: गोवा फॉरवर्ड, रिव्हॉल्युशनरी गोवन्स या स्थानिक पक्षांचीसुद्धा मदत आवश्यक आहे, असेही व्हिएगस यांनी स्पष्ट केले.
Goa Politics:...तर काँग्रेस गोव्यातून हद्दपार होईल! आपच्या वेंझी व्हिएगस यांचा इशारा; INDIA आघाडीतील बिघाडीला फुटली वाचा
AAP MLA Venzy VeigasDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: काँग्रेसची कार्यपद्धती गोमंतकीयांना माहीत आहे. ते शेवटपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर करीत नाहीत. त्यांचे नेमके धोरण काय, हे शेवटपर्यंत कळत नाही. गोव्यात काँग्रेस 'एकला चलो रे'ची नीती अवलंबेल, असे संकेत मिळत आहेत. 'इंडी'च्या घटक पक्षांना विश्वासात न घेता काँग्रेसने काही स्वतंत्र निर्णय घेतले तर काँग्रेस पक्ष गोव्यातून हद्दपार होईल, असे विधान बाणावलीतील आपचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी केले आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हल्लीच गोव्यातील आम - आदमी पक्षाच्या नेत्यांनी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची भेट घेतली व त्यांना गोव्यातील परिस्थितीची तसेच काँग्रेसच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

Goa Politics:...तर काँग्रेस गोव्यातून हद्दपार होईल! आपच्या वेंझी व्हिएगस यांचा इशारा; INDIA आघाडीतील बिघाडीला फुटली वाचा
Fengal Cyclone Goa Rain: गोव्यातही ‘फेंगल’ चक्रीवादळाचा इफेक्ट? साखळी, कुडचडे, सत्तरीला पावसाने झोडपले

गोव्यातील काँग्रेसची कार्यपद्धती नवी दिल्लीत त्यांच्या नेत्यांपर्यंत पोहोचत नाही, असे आम्हाला आढळून आले. गोव्यात 'इंडी' घटकपक्षांची एकी आवश्यक आहे. लोकांना ही आघाडी हवी आहे. त्याचबरोबर गोवा फॉरवर्ड, रिव्हॉल्युशनरी गोवन्स या स्थानिक पक्षांचीसुद्धा मदत आवश्यक आहे, असेही व्हिएगस यांनी स्पष्ट केले.

मतभेदाचे कारण असे...

१. गोवा प्रदेश पातळीवर काँग्रेस व आपमध्ये बिनसले असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. काँग्रेसच्या गोवा प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी बाणावली विधानसभा मतदारसंघातून भविष्यात काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्याबाबत सुतोवाच केल्यानंतर आपचे नेते नाराज झाले आहेत.

Goa Politics:...तर काँग्रेस गोव्यातून हद्दपार होईल! आपच्या वेंझी व्हिएगस यांचा इशारा; INDIA आघाडीतील बिघाडीला फुटली वाचा
Rohan Harmalkar Arrest: जीवे मारण्याची धमकी व मारहाण प्रकरणानंतर आता दुसऱ्या घटनेत 'मगो'चे नेते हरमलकरांना अटक

२. २०२७ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 'आप'ने लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात काँग्रेस उमेदवाराला जोरदार समर्थन देत प्रचार केला होता. पुढे काँग्रेस साह्य करेल, अशी त्यामागे आशा होती.

३. सध्या आपसह काँग्रेस 'इंडी' आघाडीत आहेत. बाणावलीत आपचा आमदार आहे. असे असूनही निंबाळकर तेथे काँग्रेस उमेदवार देण्याची भाषा करत असल्याने आप नेते नाराज झाले आहेत. पालेकर यांनी नाराजी व्यक्तही केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com