गोव्यात भाजपची दडपशाही, तृणमूल काँग्रेसच्या कार्यक्रमांवर बंदी!

गोवा सरकार (Government of Goa) लोकांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने (TMC) सोमवारी केला.
TMC
TMCDainik Gomantak
Published on
Updated on

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल आत्तापासून वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही विधानसभा निवडणूकांची (Assembly elections Goa) जय्यत तयारी राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप (BJP) आपल्या पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहे. तर दुसरीकडे राज्यात प्रमुख पक्ष असणारा कॉंग्रेसदेखील (Congress) भाजपने ज्याप्रकारे कोरोना काळात कामकाजाची हाताळणी केली त्यावरुन निशाणा साधत आहे. तर दुसरीकडे स्थानिक पक्षही भाजप सरकारशी (BJP government) युती करण्यास टाळाटाळ करत आहेत. या पाश्वभूमीवर अनेक पक्षांचे प्रमुख नेते राज्यातील जनतेला रिझविण्यासाठी मोठ- मोठ्या प्रचारसभा घेण्यासाठी गोव्यामध्ये दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाची आणि पोलिस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, गोवा सरकार (Government of Goa) लोकांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने (TMC) सोमवारी केला. सोमवारी पणजीतील आझाद मैदानावर होणाऱ्या टीएमसीच्या 'पीपल्स चार्जशीट' कार्यक्रमाला पोलिसांनी स्थगिती दिली. दुसरीकडे टीएमसीने दावा केला की, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या गोवा दौऱ्याच्या अगोदर हा कार्यक्रम होणार होता.

TMC
गोव्यातील राजकारण 'या' बड्या नेत्यांच्या एन्ट्रीने ढवळून निघणार

ममता बॅनर्जी 28 अक्टोबर रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. 40 सदस्यीय असलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असून राष्ट्रीय स्तरावर आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी टीएमसी आपले सर्व प्रयत्न येथे करत आहे. दरम्यान टीएमसी नेत्यांनी सांगण्यात येत आहे की, त्रिपुराप्रमाणे गोव्यातील भाजप सरकार घाबरले असून म्हणूनच ते अशी पावले उचलत आहे. कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर टीएमसी गोवाने ट्वीट करत म्हटले की, "हे अस्वीकार्य आहे. सत्तेचा गैरवापर सरकारकडून केला जात आहे. 'पीपल्स चार्जशीट'च्या सुटकेच्या भीतीने प्रशासन लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. चार दिवसांपूर्वी कार्यक्रमाला परवानगी दिल्यानंतर आता त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत परवानगी नाकारली आहे.

TMC
गोव्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर करणार TMC मध्ये एन्ट्री!

ममता बॅनर्जी यांनी गोवा सरकारच्या या निर्णयाला विरोध करत म्हटले की, हे बरोबर नाही, त्यांनी आमच्या गोव्यातील कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे, गोवा टीएमसीच्या इतर नेत्यांसह टीएमसी नेते बाबुल सुप्रियो, महुआ मोइत्रा, सौगत रॉय आणि लुईझिन्हो फालेरो (Luizinho Faleiro) यांनी याला विरोध करत 'पीपल्स चार्जशीट' दाखवली आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, "गोव्यातील भाजप सरकारचे खोटे बोलणे समोर आले आहे. गोव्याच्या जनतेला खूप त्रास सहन करावा लागला आहे. आज गोवा टीएमसीने 'पीपल्स चार्जशीट' लाँच केली आहे, जी सरकारच्या धोरणांमुळे आणि कुप्रबंधनामुळे लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांची यादी दर्शवते.

TMC
तृणमूल गोव्यात काँग्रेसला कमकुवत करतेय

फालेरो यांना पक्षाचे उपाध्यक्ष करण्यात आले

तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) अलीकडेच लुईझिन्हो फालेरो यांची पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. "अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (AITC) च्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी लुईझिन्हो फालेरो यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा आहे," टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी गेल्या शुक्रवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

"चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी लोकांच्या विकासासाठी उत्साहाने काम केले. आताही आम्हाला विश्वास आहे की, त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली एआयटीसी उंचीवर जाईल आणि प्रत्येक भारतीय नागरिकाच्या लोकशाही अधिकारांचे रक्षण करण्यासाठी लढा देईल.

फालेरो यांनी अलीकडेच काँग्रेस पक्ष सोडला आणि 29 सप्टेंबर रोजी टीएमसीमध्ये सामील होण्यापूर्वी गोवा विधानसभेच्या सदस्यपदाचा राजीनामाही दिला होता. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीने गोव्यात निवडणूक राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. 40 सदस्यीय गोवा विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com