तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांचा गोवा दौरा 28 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. गोव्यातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान एकामागून एक सरप्राईज मिळणार असल्याचे समोर येत आहे. 90 च्या दशकातील प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या यादीत अभिनेत्री नफिसा अली (Actress Nafisa Ali) आणि लकी अली (Lucky Ali) यांच्या नावाचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी 2 नोव्हेंबर रोजी गोव्याहून परतणार आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रीय पातळीवर तृणमूल काँग्रेसची लोकप्रियता वाढली आहे. टीएमसीने त्रिपुरा, गोवा, मेघालय, आसाम आणि यूपीमध्ये आपला विस्तार सुरु केला आहे. यूपीमधील काँग्रेसचे माजी नेते ललितेशपती त्रिपाठी (Laliteshpati Tripathi) यांनी सोमवारी टीएमसीमध्ये प्रवेश केला. यापूर्वी आसाम काँग्रेसच्या माजी नेत्या सुष्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना राज्यसभा खासदारपद देण्यात आले आहे.
लकी अली आणि नफीसा अली देखील टीएमसीमध्ये सामील होण्याची शक्यता
ममता बॅनर्जीचे बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी गोव्याला जात आहेत. केवळ बॉलीवूड अभिनेत्री वर्षा उसगावकरच नाही तर लकी अली आणि नफिसा अली सारखे बॉलिवूड स्टार देखील टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात. टीएमसीचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर देखील टीएमसीच्या विस्तारात महत्वाची भूमिका बजावत आहेत.
वर्षाचे वडील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे संस्थापक होते
वर्षा उसगावकर यांचा जन्म गोव्यातील एका कोकणी कुटुंबात झाला. त्यांचे वडील अच्युत के. एस उसगावकर हे गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे संस्थापक आहेत. ते गोवा विधानसभेचे उपसभापतीही होते. ते एकापेक्षा जास्त वेळा मंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे गोव्याचा लोकप्रिय चेहरा म्हणून वर्षा उसगावकरकडे पाहिले जाते. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपट 'गमत जम्मत'ने चित्रपटाने केली. हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर, वर्षा 1988 मध्ये बीआर चोप्रा यांच्या लोकप्रिय पौराणिक मालिका महाभारतमध्ये दिसली, ज्यामध्ये तिने उत्तराची भूमिका साकारली होती. वर्षाने 1991 मध्ये आलेल्या 'दूध का कर्ज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अक्षय कुमारसोबत 'हत्या' चित्रपटातही वर्षा दिसली होती. वर्षा यांनी अल्पावधीतच चित्रपट जगतात चांगली छाप पाडली होती. ती रजनीकांत, नाना पाटेकर, जितेंद्र, जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती सारख्या मोठ्या स्टार्स सोबत सुद्धा दिसली, पण तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती महाभारतातमधून.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.