तृणमूल गोव्यात काँग्रेसला कमकुवत करतेय

तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) काँग्रेसलाच (Congress) शह देऊन, भाजपलाच पुन्हा सत्तेत जाण्यास मदत करीत आहे. मिकी पाशेको यांचा फालेरो यांच्यावर निशाणा
तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) गोव्यात (Goa) काँग्रेसलाच (Congress) कमकुवत करताना दिसत आहे.
तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) गोव्यात (Goa) काँग्रेसलाच (Congress) कमकुवत करताना दिसत आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात (Goa) भाजपला (BJP) शह देण्यासाठीच तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) गोव्यात एन्ट्री केली आहे. असे लुईझिन फालेरो (Luisin Falero) यांनी सांगितले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. कारण तृणमूल काँग्रेस गोव्यात काँग्रेसलाच कमकुवत करताना दिसत आहे. याचा फायदा भाजपलाच होणार आहे. असा निशाणा आमदार मिकी पाशेको (Mickey Pashko) यांनी लुईझिन फालेरो यांच्यावर पत्रकार परिषदेत बोलताना साधला.

तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) गोव्यात (Goa) काँग्रेसलाच (Congress) कमकुवत करताना दिसत आहे.
फालेरो ममता बॅनर्जींची भेट घेऊन गोव्याला परतले

पाशेको म्हणाले, काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात मी नुवे आणि बाणावली मतदार संघातून केली आहे. नावेलीत फिरल्यानंतर असे जाणवले की काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या गैरसमजातून पक्षातून बाहेर पडत आहेत. लुईझिन फालेरो यांनी देखील काँग्रेसला पक्षाला रामराम करत पक्षनेत्यांवर टीकेची झोड उठवित असून, काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना फोडत आहेत. गोव्यात तृणमूल काँग्रेस हे काँग्रेसलाच संपवायला निघाले आहे. त्यामुले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फालेरो यांच्यावर विश्वास न ठेवता विचारपूर्वक निर्णय घ्यावा. तृणमूल काँग्रेस काँग्रेसलाच शह देऊन भाजपलाच पुन्हा सत्तेत जाण्यास मदत करीत आहे.

तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) गोव्यात (Goa) काँग्रेसलाच (Congress) कमकुवत करताना दिसत आहे.
Mamata Banerjee 28 ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर!

फालेरो यांनी काँग्रेसमध्ये असताना कधीच आक्रमक भूमिका घेतली नाही, तसेच त्यांनी केलेली चूकीची कामांवर पांघरुण घालण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. फालेरो यांनी भाजपला मदत करु नये, तसेच बंगालमधील रोहिंग्यांना गोव्यात घेऊन येऊ नये. असे पाशेको यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com