Goa Taxi Protest
Goa taxi protest against Mauvin GodinhoDainik Gomantak

Goa Taxi: टॅक्सीचालकांनी काय गुंडगिरी केली? कोलव्यात मंत्री गुदिन्‍हो यांचा निषेध; चालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती

Goa Taxi Protest: फिडॉल परेरा यांनी गुदिन्‍हो हे परप्रांतीयांना सांभाळणारे नेते असून त्‍यांना गोव्‍यातील टॅक्‍सीचालकांचे काहीच पडून गेलेले नाही, असा आरोप केला.
Published on

मडगाव: सध्‍या आराेग्‍यमंत्री विश्वजीत राणे यांच्‍या विरोधात राज्‍यातील सर्व डॉक्‍टर एकत्र आलेले असतानाच गोव्‍यात टॅक्‍सी ॲग्रीगेटर्सना विरोध करणाऱ्या टॅक्‍सीचालकांना वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी ‘गुंड’ संबोधल्‍याने तेही अडचणीत येण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गोव्‍यात ॲग्रीगेटर्स टॅक्‍सी सेवा कुठल्‍याही परिस्‍थितीत चालू होणार असे सांगताना टॅक्‍सीचालकांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी म्‍हटल्‍याने आज सामाजिक कार्यकर्ते आणि टॅक्‍सीचालकांनी कोलवा येथे सभा घेऊन त्‍यांचा निषेध केला.

Goa Taxi Protest
Goa Taxi App: 95% गोमंतकियांचे टॅक्सी ॲप धोरणाला समर्थन, टीटीएजीतर्फे गुप्त सर्वेक्षण, धोरण दूरदृष्टीचे असल्याचा दावा

आम्‍ही गुंड नाही, तर हे सरकार जे ॲग्रीगेटर टॅक्‍सी आणू पाहात आहे ते खऱ्या अर्थाने गुंड आहे. अशा गुंडांना वाहतूकमंत्री गुदिन्‍हो साहाय्‍य करत आहेत, असा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्त्या फिडॉल परेरा यांनी केला. यावेळी टॅक्‍सीचालकांना पाठिंबा देण्‍यासाठी तनोज अडवलपालकर, रामा काणकोणकर, शंकर पोळजी तसेच संजय बर्डे उपस्‍थित होते.

Goa Taxi Protest
App Based Taxi: महिला टॅक्सीचालक काळाची गरज! ॲप आधारित टॅक्सीला एकमताने पाठिंबा; गोव्यातील चर्चासत्रात परिवर्तनाचा सूर

‘काय गुंडगिरी केली ते दाखवून द्यावे’

यावेळी फिडॉल परेरा यांनी गुदिन्‍हो हे परप्रांतीयांना सांभाळणारे नेते असून त्‍यांना गोव्‍यातील टॅक्‍सीचालकांचे काहीच पडून गेलेले नाही, असा आरोप केला. टॅक्‍सीचालकांना गुदिन्‍हो गुंड म्‍हणतात, पण टॅक्सीचालकांनी काय गुंडगिरी केली आहे हे गुदिन्‍हो यांनी दाखवून द्यावे, असे आव्‍हान त्‍यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com