App Based Taxi: महिला टॅक्सीचालक काळाची गरज! ॲप आधारित टॅक्सीला एकमताने पाठिंबा; गोव्यातील चर्चासत्रात परिवर्तनाचा सूर

Women Taxi Drivers: ॲप आधारित टॅक्सी तसेच महिला ड्रायव्हर असलेली टॅक्सी ही काळाची गरज असल्याचे मत राज्यातील विविध क्षेत्रांतील महिलांनी व्यक्त केले.
App based taxi service with women drivers in goa
App based taxi service with women drivers in goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महिलांना रोजगाराच्या संधी मिळायला हव्या, त्या स्वावलंबी व्हायला हव्यास, असे आपण बोलत असतो, परंतु यासाठी लागणारी साधने उपलब्ध करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज देशात, परदेशात कुठेही जा, आपल्याला ॲप आधारित टॅक्सी मिळते, परंतु गोव्यातच ती उपलब्ध नाही, याचा परिमाण राज्याच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, विकास अशा विविध क्षेत्रावर पडत असून ॲप आधारित टॅक्सी तसेच महिला ड्रायव्हर असलेली टॅक्सी ही काळाची गरज असल्याचे मत राज्यातील विविध क्षेत्रांतील महिलांनी व्यक्त केले.

गोवा सरकारच्या ॲप आधारित टॅक्सी धोरणाला पूर्ण पाठिंबा दर्शविला. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या गोव्यातील टॅक्सी, वाहन चालक आणि वाहनांचे दर यासंबंधीच्या चर्चा सत्रात उत्स्फूर्तपणे महिलांना ॲप आधारित टॅक्सी नसल्याने जाणवणाऱ्या समस्यांबाबत आपली मते व्यक्त केली.

स्मिता पाटील म्हणाल्या, मी आज या कार्यक्रमासाठी कार घेऊन आले आणि माझी गाडी, मी मिरामार येथे पार्क करून आता बसने या कार्यक्रमासाठी येथे आले आहे.

कारण पणजीत पार्किंग मिळणे, गाडी पार्क करणे, डोकेदुखी झाली आहे, तीच जर ॲप आधारित टॅक्सी असती, तर मी तीच बुक केली असती. यामुळे मला पार्किंगची समस्या जाणवली नसती, त्यासोबतच कुणाला तरी रोजगाराची संधीही उपलब्ध झाली असती. ॲप आधारित टॅक्सी नसल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

संध्या कामत म्हणाल्या, ॲप आधारित टॅक्सी महिला ड्रायव्हरला प्राधान्य देणे गरजेचे आहे. गोव्यात खरे तर यापूर्वीच ही सेवा सुरू व्हायला हवी होती, परंतु उशीर का होईना, ती सुरू होत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यातील टॅक्सी चालकांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, १५- २० वर्षांपूर्वी गोव्यातील टॅक्सी व्यवसायाची स्थिती वेगळी होती. त्यावेळी केवळ टॅक्सी व्यवसाय हा पर्यटकांवर अवलंबून असलेला व्यवसाय होता परंतु आज स्थानिक लोकसंख्या देखील वाढली आहे.

तिला देखील वाहतुकीसाठी टॅक्सीची आवश्यकता असून ज्या दरात सध्या टॅक्सी गोव्यात चालविली जाते ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. स्थानिकांना देखील ॲप आधारित टॅक्सी हवी आहे. माझ्या सारख्या कलाकाराला कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचायचे असते त्यावेळी ॲप आधारित टॅक्सी ही सुविधा पुरवू शकते त्यामुळे ॲप आधारित टॅक्सीला पूर्ण पाठिंबा असल्याचे रूचिका दवार यांनी सांगितले.

आपल्याला गोमंतकीय टॅक्सी, टॅक्सी चालकांना, संधी उपलब्ध करून देण्यासाठी गोमंतकीयांना योग्य दर देण्यासाठी ॲप आधारित टॅक्सीला प्राधान्य दिलेच पाहिजेच महिलांपासून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सर्वांसाठीच ॲप आधारित टॅक्सी महत्त्वाची आहे.

App based taxi service with women drivers in goa
Goa Taxi App: 95% गोमंतकियांचे टॅक्सी ॲप धोरणाला समर्थन, टीटीएजीतर्फे गुप्त सर्वेक्षण, धोरण दूरदृष्टीचे असल्याचा दावा

व्यवस्था सुधारण्यासाठी ॲप!

वाहतूक संचालनालयाच्या अधिकारी कीर्ती ढोके म्हणाल्या, सरकारने ॲप आधारित टॅक्सी संबंधी नवे धोरण अवलंबिण्यासाठी अधिसूचना काढली आहे. गोव्याची वाहतूक व्यवस्था सुधारून नागरिकांना चांगली सेवा देण्याचा यामागचा उद्देश आहे.

App based taxi service with women drivers in goa
Goa Taxi App: अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा महत्वाची! चेंबर ऑफ कॉमर्सकडून स्वागत; उद्योगक्षेत्रांना दिलासा मिळणार असल्याचा दावा

एखाद्या व्यक्तीला लायसन्स मिळाल्यावर सहा महिन्याच्या आत त्यांनी ॲप आधारित टॅक्सी व्यवसाय सुरू करणे अनिवार्य आहे.

टॅक्सी व्यवसायात महिला वाहन चालक याव्यात यासाठी सरकार त्यांना अनेक सुविधा पुरविणार आहे. ज्यात त्यांचा तसेच त्यांच्या परिवाराचा विमा व वाहन परवाना नूतनीकरण सवलत आदींचा समावेश आहे.

ॲप आधारित सेवेत वाहन चालकांला योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रार केल्यास अशा कंपनीवर तात्काळा ७२ तासांत कारवाई केली जाईल व चालकाला योग्य मोबदला पुरविण्यात येईल.

महिला वाहन चालकांस स्वतःचे वाहन खरेदी करण्यासाठी देखील सरकार मदत करेल.

वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी वाहन चालविण्याचा परवाना

तसेच वाहन परमिट ठळकपणे दिसेल असे वाहनात लावणे बंधनकारक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com