Goa Statehood Day: सावंत सरकारचा धिक्कार... सरकारी जाहिरातीत घटकराज्य दिनाच्या कार्यक्रमाचा साधा उल्लेखही नाही; अमरनाथ पणजीकर बरसले

Amarnath Panajikar Criticized BJP Government: गोव्याला 30 मे 1987 रोजी भारताचे 25 वे राज्य म्हणून दर्जा मिळाला.
Amarnath Panajikar Criticized BJP Government
Amarnath Panajikar Criticized BJP GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Amarnath Panajikar Criticized BJP Government: गोव्याला 30 मे 1987 रोजी भारताचे 25 वे राज्य म्हणून दर्जा मिळाला. दरवर्षी हा दिवस गोवा घटकराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, सर्व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये “गोवा घटकराज्य दिनाची” जाहिरात प्रसिद्ध करु न शकलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा धिक्कार. सरकारी जाहिरातीत घटकराज्य दिनाच्या अधिकृत कार्यक्रमाचा उल्लेखही नाही. गोव्याला भारताचे 25 वे राज्य म्हणून समावेश केल्याचे श्रेय काँग्रेसला मिळणार म्हणून भाजप सरकारने घटकराज्य दिन साजरा केला नाही, असा गंभीर आरोप काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.

गोव्याच्या काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या छोट्या आकाराच्या जाहिरातींवर प्रतिक्रिया देताना अमरनाथ पणजीकर म्हणाले की, ‘’दिवाळखोर आणि भ्रष्ट भाजप सरकारकडे गोवा घटकराज्य दिन साजरा करण्यासाठी पैसे नाहीत पण मिशन टोटल कमिशनसाठी इव्हेंट आयोजनावर करोडो रुपये खर्च केले जातात.’’

Amarnath Panajikar Criticized BJP Government
Goa Statehood Day 2024: गोवा घटकराज्य दिन विशेष! समृद्ध वारसा, इतिहास आणि संस्कृती

दरम्यान, गोवा सरकारने राज्यपाल किंवा मुख्यमंत्री यांची उपस्थिती असलेला एकही राज्यस्तरीय अधिकृत कार्यक्रम आयोजित केला नाही. गोवा घटकराज्य दिन कॉंग्रेसने गोव्याला दिल्याच्या आकसापोटीच या ऐतिहासिक दिवसांकडे भाजप सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा घणाघातही यावेळी पणजीकर यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन आज भाजपचा प्रचार केला. यावरुन त्यांचे प्राधान्य गोवा घटकराज्य दिन साजरा करण्यास नव्हे तर भाजपच्या प्रचाराला असल्याचे दिसून येते, असे टीकास्त्र पणजीकर यांनी डागले. काँग्रेस सत्तेत होते तेव्हा सरकार गोवा घटकराज्य दिनानिमित्त "कला गौरव" पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करत असे आणि गोव्यातील 60 कलाकारांचा मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करत असे. दुर्दैवाने, भाजप सरकारने सत्तेत येताच सदर कार्यक्रमाचे आयोजन थांबवले, असेही पणजीकर पुढे म्हणाले.

Amarnath Panajikar Criticized BJP Government
Goa Statehood Day: घटक राज्याचं घट्टण राज्य का आणि कोणी केले?

गोवा घटकराज्य दिन भव्य सोहळ्याने साजरा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. गोव्याला मिळालेल्या घटकराज्याच्या दर्जामुळेच गोवा विधानसभेत 40 आमदार आहेत आणि डॉ. प्रमोद सावंत स्वतःला गोव्याचे मुख्यमंत्री म्हणवतात. भारताचे दूरदर्शी पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला, याची आठवण यावेळी पणजीकर यांनी करुन दिली. काँग्रेस पक्षाने नेहमीच गोव्यातील जनतेच्या भावनांचा आदर केला आहे. ओपिनियन पोल, कोकणीला राज्य मान्यता, घटकराज्याचा दर्जा हे गोवा राज्यासाठी काँग्रेस सरकारांचे योगदान आहे, असेही अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले.

Amarnath Panajikar Criticized BJP Government
Goa Statehood Day: प्रधानमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती आणि CM सावंत यांनी दिल्या घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा

4 जून 2024 रोजी केंद्रात इंडिया आघाडी सरकार सत्तेवर येणार हे निश्चित आहे. काँग्रेस पक्ष सर्व ऐतिहासिक दिवसांचे स्मरण राज्यस्तरीय अधिकृत कार्यक्रमांसह करेल, असे शेवटी पणजीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com