Goa Budget Session: 10 वर्षांनंतर प्रथमच एकाच अधिवेशनात ‘बजेट’ मंजुरी, 6 मार्चला CM सावंत सादर करणार सातवा अर्थसंकल्प

Goa Budget Session 2026: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने ६ मार्च रोजी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Goa Budget Session 2026
Goa Budget Session 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्याचा अर्थसंकल्प दहा वर्षांनंतर प्रथमच एका अधिवेशनात मांडून तो मंजूर करण्याची योजना आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने ६ मार्च रोजी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

याआधी, २०१३-१४ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प काही दिवसांचा खंड पडलेल्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. २०१४-१५ पासून सहा महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून, पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प मंजूर करण्याची प्रथा सुरू झाली होती,

Goa Budget Session 2026
Goa Budget Session: विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार 6 मार्चपासून! CM सावंत सादर करणार अर्थसंकल्‍प

जी गेल्या आर्थिक वर्षापर्यंत सुरू होती. स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना मार्च २०१३ मध्ये अर्थसंकल्प मांडला होता. काही तातडीच्या रकमेसाठी त्यांनी लेखानुदान मंजूर केले आणि नंतर तेच अधिवेशन एप्रिलमध्ये सुरू ठेवून पूर्ण अर्थसंकल्प मंजूर केला गेला होता.

Goa Budget Session 2026
Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्याकडे साफ दुर्लक्ष, करवाटपातून निधी मिळेल ही निव्वळ दिशाभूल- अमित पाटकर

यंदा, ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर साधारण तीन दिवस त्‍यावरील चर्चेसाठी राखीव ठेवले जातील. त्यानंतर विविध खात्यांच्या मागण्या विधानसभेत मांडल्या जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com