Goa Budget Session: विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार 6 मार्चपासून! CM सावंत सादर करणार अर्थसंकल्‍प

Goa Budget Session 2026-27: राज्‍य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्‍या ६ मार्चपासून सुरू होणार आहे. राज्‍यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी यासंदर्भातील समन्‍स जारी केले आहे.
Goa Budget Session 2026
Goa Budget Session 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्‍य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्‍या ६ मार्चपासून सुरू होणार आहे. राज्‍यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी यासंदर्भातील समन्‍स जारी केले आहे. हे चौदा दिवसीय अधिवेशन २७ मार्चपर्यंत चालणार आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्‍प अधिवेशनात सादर करणार असल्‍याने त्‍याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून राहिले आहे.

हिवाळी अधिवेशन १२ ते १६ जानेवारी या पाच दिवसांच्‍या कालावधीत घेण्‍यात आले होते. त्‍यामुळे विरोधी आमदारांना प्रश्‍‍नोत्तरासाठी आणि आपल्‍या मागण्‍या मांडून त्‍या सरकारकडून पूर्ण करून घेण्‍यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्‍हता.

Goa Budget Session 2026
Goa Winter Session 2026: 'बर्च फायर'चा तपास CBI कडे सोपवा! "सरपंच, सचिवावर कारवाई, मग संबंधित मंत्र्यांना अभय का?" युरींनी सरकारला धरलं धारेवर

परंतु अर्थसंकल्‍पीय अधिवेशन १४ दिवसांचे असल्‍याने विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनाही आपापल्‍या मतदारसंघांतील जनतेचे प्रश्‍‍न, समस्‍या सभागृहात मांडून त्‍याबाबत तोडगा काढून घेता येईल.

Goa Budget Session 2026
Goa Winter Session 2026: विधानसभेत विधेयकांचा 'पंच'! शिक्षण, कृषी, व्यापार अन् पंचायतींसाठी कायदे मंजूर; अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्याच्या हिताचे मोठे निर्णय

राज्‍यात गेल्‍या काही महिन्‍यांत ढासळलेली कायदा-सुव्‍यवस्‍था, बर्च बाय रोमियो लेन क्‍लबला लागलेली आग, दरोडे, खून, बेकायदा जमीन रूपांतरण असे अनेक प्रश्‍‍न उफाळून आले होते. त्‍यातील काही प्रश्‍‍नांवरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com