

पणजी: केंद्र सरकारने नुकताच २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर केला, त्यात गोव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे आणि आर्थिकदृष्ट्या राज्याची फसवणूक झाली आहे.
भाजप सरकारद्वारे सांगितले जात असलेल्या कर वाटपाद्वारे ५,५७०.८३ कोटी रुपये मिळणार आहेत, असे सांगणे म्हणजे लोकांची निव्वळ दिशाभूलीचाच प्रकार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
काँग्रेस भवनात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जॉन नाझारेथ, ॲड. श्रीनिवास खलप आदींची उपस्थिती होती.
पाटकर म्हणाले, कर वाटपातून मिळणारी ही घटनात्मक बाब आहे. त्याला कोणतीही विशेष देय रक्कम म्हणता येणार नाही. ११ जानेवारी रोजी राज्य सरकारने केंद्राकडे राज्यासाठी ४,००० कोटींची मागणी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.